एक्स्प्लोर

Rahul Gandhi : अदानींच्या कंपनीतील 20 हजार कोटी कोणाचे? माझ्या प्रश्नाचे भाजप उत्तर का देत नाही? राहुल गांधी यांचा थेट सवाल

Rahul Gandhi : 2019 मधील वक्तव्यानंतर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी यांच्या संबंधावरून घणाघात केला.

Rahul Gandhi : मी संसदेत अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या साध्या प्रश्नाचे उत्तर भाजप का देत नाही? असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. 2019 मधील वक्तव्यानंतर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी यांच्या संबंधावरून घणाघात केला. कायमचे अपात्र केले तरी मी प्रश्न विचारणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राहुल गांधी यांनी यावेळी झालेल्या कारवाईवरून कोणतीही वक्तव्य न करता संसदेतील भाषणातील भाजपकडून करण्यात आलेल्या कारवाईचा घटनाक्रम सांगितला. संसदेत अदानी आणि मोदींचा काय संबंध विचारल्यानंतर भाजपने माझ्याविरोधात ओरड सुरु केल्याचे राहुल म्हणाले. मोदी आणि अदानी यांचं नातं नवीन नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले? तो पैसा कोणाचा आहे? अदानी आणि मोदींचं नात नवीन नाही. मी मुद्देसुदपणे संसदेत अदानीवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी संदर्भही दिले होते. तरीही भाजपच्या मंत्र्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती दिली. संसदेत माझ्याबाबतीत खोटे आरोप करण्यात आले. मला प्रश्न विचारू दिले नाहीत. मात्र, प्रश्न विचारणे बंद करणार नाही. माझा तो इतिहास नाही. मी देशाच्या लोकशाहीसाठी लढतोय, घाबरत नाही. अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले? त्यामध्ये चीनमधील व्यक्तीचाही सहभाग आहे. खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही. अदानीच्या शेल कंपनीत कोणी गुंतवणूक केली हा माझा प्रश्न आहे. मला प्रश्न का विचारू दिले जात नाहीत असं विचारले असता लोकसभा सभापती म्हणतात चला एक चहा घेऊ म्हणतात. 

माझ्या भाषणाला घाबरले 

माझ्या पुढच्या भाषणाची पंतप्रधानांना भीती वाटल्याने मला अपात्र ठरवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. माझ्या पुढच्या भाषणाची त्यांना भीती वाटत होती. जी अदानीवर होणार होती. मी त्याच्या डोळ्यात ते पाहिले. त्यामुळे ते माझ्या पुढच्या भाषणाबद्दल घाबरले होते. संसदेतील पुढचे भाषण अशी त्यांची इच्छा नव्हती. मी संसदेत आहे की बाहेर मला काही फरक पडत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. मला माझी तपश्चर्या करायची आहे, ते करून दाखवीन. मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. नरेंद्र मोदींशी अदानी यांचा काय संबंध? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget