Congress President Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी केली 'ही' कामगिरी
Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी एक नवीन कामगिरी केली आहे.
![Congress President Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी केली 'ही' कामगिरी Congress News even after losing congress president election shashi tharoor has a reason to celebrate this achievement he achieved Congress President Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी केली 'ही' कामगिरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/20/e89c5e1f4598b648ee794f06e8d230511666253898106339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत. या निवडणुकीत खर्गेंनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा पराभव केला. थरुर यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या नावावर एक नवीन कामगिरी नोंदवण्यात आली आहे. या कामगिरीनं शशी थरुर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या निवडणुकीत खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरुर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळली. थरुर यांना मिळालेली मते ही गेल्या 25 वर्षात हरलेल्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मते आहेत.
शशी थरुर जरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वियजी झाले नसले तरी त्यांनी एक नवीन कामगिरी केली आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत. गेल्या 25 वर्षात पराभूत उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. थरुर यांना एकूण मतांपैकी 11.95 टक्के मते मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9, हजार 385 मते पडली होती. त्यापैकी 8 हजार 969 मते वैध मानण्यात आली होती. यामध्ये खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली तर थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत.
22 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल
काँग्रेस अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक ही 22 वर्षांपूर्वी झाली होती. सोनिया गांधी यांना उत्तर प्रदेशचे जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला होता. या निवडणुकीत एकूण 7 हजार 542 वैध मतांपैकी जितेंद्र प्रसाद यांना 100 पेक्षा कमी मते मिळाली होती. त्यांना एक टक्क्यापेक्षा थोडी जास्त मते मिळाली होती. सोनिया गांधींना 7 हजार 448 मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 7 हजार 771 मते पडली होती, परंतू 229 मते अवैध ठरली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दोन वर्षे हे पद भूषवले होते.
1997 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते
सोनिया गांधी येण्यापूर्वी सीताराम केसरी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. 1997 च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले महाराष्ट्रातील शरद पवार, राजस्थानचे दिवंगत नेते राजेश पायलट आणि सीताराम केसरी हे उमेदवार होते. एकूण 7 हजार 460 वैध मतांपैकी शरद पवार यांना 888, राजेश पायलट यांना 354 आणि सीताराम केसरी यांना 6 हजार 224 मते मिळाली होती. सीताराम केसरी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Congress New President: काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचा दणदणीत विजय; थरूर यांचा पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)