एक्स्प्लोर

100 रूपयांच्या स्टँप पेपरवर निष्ठा आणि इमानदारीची शपथ

कोलकाता: राजकारणात कुणीही कुणाचा फार काळ मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. कारण राजकारणात निष्ठा आणि इमानदारीचे निकष पावलापावलांवर बदलतात. सत्तेच्या लाभासाठी राजकीय नेते वारंवार निष्ठा बदलतात. हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असलेलं सत्य. कपडे बदलावे तसे राजकारणात पक्ष किंवा गट बदलले जातात.   नेमका यावर रामबाण उपाय म्हणून पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेल्या आमदारांकडून काँग्रेसने शपथपत्र लिहून घेतलं आहे. अर्थात हे शपथपत्र साध्या कागदावर नसून त्यासाठी चक्क 100 रूपयांचा स्टँप पेपर वापरण्यात आला आहे.   म्हणजेच राजकारणात निष्ठा किंवा इमानदारी ही स्टँप पेपरवरही लिहून देण्याचा नवा पायंडा काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये सुरू केला आहे.   काँग्रेस अध्यक्षांच्या नावाने लिहून देण्यात आलेल्या या शपथपत्रात काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदाराने भविष्यात कधीही पक्षाबरोबर गद्दारी किंवा बंडखोरी करणार नसल्याचं लिहून दिलं आहे.   राजकारणी तसे आश्वासन देण्यात अग्रेसर असतात. किंबहुना प्रत्येकवेळी आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचं कसब राजकारणातली पहिली पात्रताच बनली आहे जणू. त्यावर नामी उपाय म्हणून आता स्टँप पेपरचा उतारा काढण्यात आला आहे.   काँग्रेसचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांकडून निष्ठेचं शपथपत्र 100 रूपयांच्या बाँडवर लिहून घेतलं आहे. ही बाब सार्वजनिक झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने आपली नाराजी व्यक्त केली आहे. निष्ठा ही काही स्टँप पेपरवर लिहून देण्याची बाब नाही. असंही पक्षाच्या हायकमांडने अधीर चौधरी यांना सुनावलं आहे. त्यावर अधीर चौधरी यांनी आपण हे शपथपत्र देण्यासाठी एकाही आमदारावर दबाब टाकला नाही. प्रत्येक आमदाराने स्वेच्छेने हे प्रतिज्ञापत्र 100 रूपयांच्या स्टँप पेपरवर लिहून दिल्याचा दावाही केला आहे.   पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसने निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराकडून लिहून घेतलेलं शपथपत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करण्यात आलं आहे. तसंच या पत्रात निष्ठेची शपथ घेत कधीही पक्षविरोधी कारवाया करणार नसल्याची शपथही घेतली आहे. कोणत्याही पक्षविरोधी कारवायात आपला सहभाग आढळल्यास आपण पक्षाचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचंही या निवडून आलेल्या आमदारांनी स्टँपपेपरवर लिहून दिलं आहे.    

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
MNS : मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य

Embed widget