Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
Bank Holiday July 2026: २० ते २६ जुलै २०२६ दरम्यान बँका कधी बंद राहतील? आरबीआयच्या बँक सुट्ट्यांची यादी, साप्ताहिक सुट्ट्या आणि तुमच्या राज्यातील सुट्ट्यांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Bank Holiday: पुढील आठवड्यात जर तुम्हाला बँकेशी (Bank) संबंधित काही महत्त्वाचे काम करायचे असल्यास, सर्वप्रथम बँकेच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर नक्की तपासा. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, विविध राज्यांमधील सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे 20 जुलै ते 26 जुलै 2026 दरम्यान बँका अनेक दिवस बंद राहतील. किंबहुना, सर्व राज्ये एकाच वेळी बंद राहणार नाहीत. त्यामुळे आपण या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती कोणत्या दिवसाला आहे, हे आपण जाणून घेऊया. (Bank Holiday from july 20 to july 26)
Bank Holiday: 20 ते 26 जुलै दरम्यान बँका कधी बंद राहतील?
20 जुलै (सोमवार) - या दिवशी बहुतेक राज्यांमध्ये बँका सुरू राहतील. या दिवसाला कोणत्याही बँकेला सुट्टी नाही.
21 जुलै (मंगळवार) - स्थानिक सणांमुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहू शकतात. पण इतर ठिकाणी बँका बंद राहणार नाहीत.
22 जुलै (बुधवार) - खर्ची पूजेच्या निमित्ताने आगरतळा (त्रिपुरा) येथे बँका बंद राहतील.
23 जुलै (गुरुवार) - गुरुवारी बँका सुरू राहतील.
24 जुलै (शुक्रवार) – स्थानिक सणांमुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहू शकतात.
25 जुलै (शनिवार) – हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि आरबीआयच्या नियमांनुसार देशभरातील बँका बंद राहतील.
26 जुलै (रविवार) – 26 तारखेला रविवार आहे आणि त्यामुळे देशभरातील सर्व बँक शाखा बंद राहतील.
Bank Holiday July 2026: वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या का असतात?
आरबीआय (RBI) दरवर्षी बँकेच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करते. यामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या, धार्मिक सण, प्रादेशिक सण आणि राज्य सरकारांनी जाहीर केलेल्या सुट्ट्यांचा समावेश असतो. त्यामुळे, एका राज्यात बँका बंद असू शकतात, तर दुसऱ्या राज्यात बँका नेहमीप्रमाणे सुरू राहू शकतात.
Online Banking Services : ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील का?
बँकेच्या शाखा बंद असूनही, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. ग्राहक ऑनलाइन पैसे हस्तांतरण, बिल भरणे आणि इतर डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करू शकतील.
Bank Holiday: बँकेत जाण्यापूर्वी हे नक्की करून घ्या
जर तुम्हाला चेक जमा करायचा असेल, ड्राफ्ट काढायचा असेल, किंवा रोख रक्कम जमा करायची किंवा काढायची असेल, तर बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा. यामुळे तुमचा अनावश्यक त्रास वाचेल.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















