एक्स्प्लोर

Corona Vaccination: एक और जुमला चकनाचूर! लसीकरणावरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

लसीकरणाच्या मुद्यावरुन काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. 2021 या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्वांना लसीचे दोन डोस देऊ, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, ते पूर्ण केले नाही.

Congress On BJP :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. 2021 या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्वांना लसीचे दोन डोस देऊ, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, आज या वर्षाचा शेवटचा दिवस असून, ते आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. असे सांगताना राहुल गांधी यांनी 'देश अब भी वैक्सीन से दूर, एक और जुमला चकनाचूर'! असे ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जूनमध्ये सुप्रीम कोर्टात या वर्षाच्या शेवटी सर्व पात्र नागरिकांनी लसीचे दोन डोस देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्याप अनेकांना लसीकरण झाले नाही, त्यांना लसीकरणाची अपेक्षा असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत 144 कोटींहून अधिक डोस 
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 144 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 66 लाख 65 हजार 290 डोस देण्यात आले. दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासोबतच कोरोनाचा धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16 हजार 764 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 220 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 1,270 रुग्ण सापडले आहेत.  देशात आतापर्यंत 1 हजार 270 लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. आतापर्यंत देशातील 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहेत. यानंतर केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 361 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 80 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7585 रुग्ण बरे झाले होते, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार 363 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget