(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 Restrictions : मुंबईत संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी
नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम 144 (section 144 ) चा कालावधी पोलिसांनी 15 जानेवारी पर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, ' 31 डिसेंबरच्या अनुशंगाने नागरिकांनी पँनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुशंगाने सर्व मेजर काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.' नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईत काल (30 डिसेंबर) 3 हजार 671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाच मृत्यू नाही. याशिवाय, 371 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 49 हजार 159 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 96 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 हजार 360 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 505 दिवसांवर पोहचलाय.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून 31 डिसेंबरला मुंबईत हायअलर्ट जारी, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द
ओमायक्रॉनच्या धर्तीवर मुंबईची तयारी काय? पाहा कसं आहे नियोजन...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha