Sonia Gandhi Covid Positive : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण
Sonia Gandhi Covid Positive : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतःला स्वतःला घरातचं आयसोलेट केलं आहे. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Sonia Gandhi Covid Positive : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi Vadra) त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. सोनिया गांधींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी लखनौ दौऱ्याहून माघारी परतल्या आहेत. अद्याप त्यांची कोविड चाचणी करण्यात आलेली नाही.
सोनिया गांधींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं
काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये सोनिया गांधी यांनी अनेक नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यापैकी काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधींनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. तसेच, संपर्काता आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहनंही केलं आहे. गेल्या काही दिवसांत प्रियांका गांधी सोनिया गांधी यांच्यासोबत होत्या. त्यामुळे सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, त्यांनी आपला लखनौ दौरा रद्द केला आहे. त्या दिल्लीला परतल्या आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचंही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. आम्ही या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :