(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mallikarjun Kharge Health: भाषण करतानाच खरगेंची प्रकृती बिघडली; पण, पुन्हा जोमात उभारून भाषण; म्हणाले, मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय.....
Congress President mallikarjun kharge health: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी खरगे मंचावरून जाहीर सभेला संबोधित करत होते.
Congress President mallikarjun kharge health: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी खरगे मंचावरून जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यांची प्रकृती थोडी ठिक झाली. तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, "आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा आहे आणि इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवले जात नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन."
पंतप्रधान खोटे अश्रू ढाळतात: मल्लिकार्जुन खरगे
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा येथे काँग्रेस अध्यक्ष भाषण देत होते. मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, 'पीएम मोदींनी गेल्या 10 वर्षांत भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. तुम्ही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता जो 10 वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्याने काय समृद्धी आणली की नाही.
#WATCH | J&K: Congress National President Mallikarjun Kharge says, "We will fight to restore statehood...I am 83 years old, I am not going to die so early. I will stay alive till PM Modi is removed from power..." https://t.co/dWzEVfQiV0 pic.twitter.com/ES85MtuTkL
— ANI (@ANI) September 29, 2024
भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत खरगे म्हणाले की, पंतप्रधान इथे येऊन तरुणांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. सत्य हे आहे की, या लोकांनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशातील तरुणांना अंधारात ढकलले आहे. याला खुद्द पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी खरगे जसरोटा येथे गेले होते. उधमपूर जिल्ह्यातील रामनगर येथे ते आणखी एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करणार होते. खरगे यांना चक्कर आल्याने त्यांना एका खोलीत नेण्यात आले जेथे डॉक्टरांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. ते दुसऱ्या रॅलीला उपस्थित राहू शकतात की नाही याबद्दल ते सल्ला देतील, असे जम्मू-काश्मीर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र शर्मा यांनी पीटीआयला सांगितले. काँग्रेस नेते ठाकूर बलबीर सिंग यांनी परिस्थितीची आणखी माहिती दिली आणि एएनआयला सांगितले, अत्यंत उष्णतेमुळे त्यांना गुदमरल्यासारखे वाटले आणि तरीही त्यांनी त्यांचे भाषण पूर्ण केले. ते थोडी विश्रांती घेतील आणि नंतर रामनगरमधील दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून जातील.