एक्स्प्लोर
पतंजलीच्या दंतकांतीला टक्कर देण्यासाठी कोलगेटकडून नवी आयुर्वेदिक पेस्ट
![पतंजलीच्या दंतकांतीला टक्कर देण्यासाठी कोलगेटकडून नवी आयुर्वेदिक पेस्ट Colgate Presents Colgate Toothpaste To Compete Patanjali Dantkanti पतंजलीच्या दंतकांतीला टक्कर देण्यासाठी कोलगेटकडून नवी आयुर्वेदिक पेस्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/01190229/colgate-vedshakti-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून कोलगेटनेही नवीन आयुर्वेदिक टूथपेस्ट कोलगेट सिबाका वेदशक्ती बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही टूथपेस्ट पतंजलीच्या दंतकांती पेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या बाजारात दंतमंजानावरून मोठे युद्ध सुरु आहे. योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिकने दंतकांती टूथपेस्टने बाजारात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पतंजलीच्या दंतकांतीने टूथपेस्टच्या बाजारपेठेतील कोलगेटला मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे कोलगेटने सुरुवातीला मीठाने युक्त टूथपेस्ट बाजारात आणली. तर आता याच जोडीला कोलगेट सिबाका वेदशक्ती ही पूर्णत: आयुर्वेदिक पेस्ट बाजारात आणली आहे.
अमेरिकेतील त्रैमासिक आहवालानंतर भारतात नवीन आयुर्वेदिक टूथपेस्टची घोषणा केली. ही घोषणा करताना, कंपनीने मीठयुक्त पेस्ट कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट आणि लवंगयुक्त या दोन टूथपेस्टला प्रयोगिक तत्वावर बाजारपेठेत उतरवून ग्राहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता कोलगेट सिबाका वेदशक्तीच्या नवाने नवी टूथपेस्ट बाजारात लाँच करणार आहे. ही टूथपेस्ट आयुर्वेदिक पद्धतीने बनवण्यात आल्याने दातांच्या समस्या दूर होतील, असा दावा कंपनीने केला आहे.
सध्या पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टच्या 100 ग्रॅमच्या पॅकेटची किंमत 40 रुपये आहे. तर दुसरीकडे कोलगेटने आपली वेदशक्ती टूथपेस्टच्या 175 ग्रॅमची किमत 50 रुपये ठेवली आहे. दरम्यान, या टूथपेस्टच्या नावावरून पतंजलीने हरकत घेतली आहे. पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजरावाल यांनी ट्विट करून वेदशक्ती हे नाव वापरण्यास हरकत घेतली आहे. त्यांच्या मते हे पूर्णपणे भारतीय संस्कृतीवर आक्रमण आहे. जिथे वेदांना परमेश्वराप्रमाणे पुजा होते.
टूथपेस्टच्या बाजरपेठेतील ओरल केअरची बाजारपेठ 15 हजार कोटी रुपये आहे. त्यामध्ये केवळ टूथपेस्टची उत्पादने सात हजार कोटींची विक्री होते. या क्षेत्रावर कोलगेट पॉलमोलिवने 55.7% मालकी प्रस्थापित केली आहे. तर पतंजलीचे या क्षेत्रातील मालकी केवळ 7 ते 8% इतकीच आहे. सध्या पतंजलीने बाजरपेठेत मोठी गती घेतली आहे.
योगगुरू रामदेव बाबांनी कोलगेटचे दरवाजे बंद करणार असल्याचा निरधार यापूर्वीच व्यक्त केला होता. तर नेस्लेच्या चिमणीला ही बाजारातून हद्दपार करणार असल्याचे सांगितले. यासाठी नेसलेला आव्हान देण्यासाठी पतंजलीने आपले नूडल्स बाजारात आणले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)