एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना भेटणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी उद्धव ठाकरे त्यांची भेट घेतील.आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री यांनी सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेऊन शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. पण शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत असतील.
लहान भाऊ मोठ्या भावाला भेटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या पंतप्रधान मोदींशी भेट
पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु ही औपचारिक भेट असून अंदाज वर्तवू नका, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, 'मी माझ्या मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार आहे'. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मोदींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची मोदींसोबतची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी ते पुण्यामधील कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींना विमानतळावर भेटले होते.
असा असेल उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा!
दुपारी 2 वाजता : मुंबईवरुन निघणार
5 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेटणार
7 वाजता : सोनिया गांधी यांना 10 जनपथ इथे भेटणार
8 वाजता : लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement