एक्स्प्लोर

लहान भाऊ मोठ्या भावाला भेटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या पंतप्रधान मोदींशी भेट

25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता. मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे हे दिल्लीला जाणार असून ते पंतप्रधानांना भेटणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, 'मी माझ्या मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार आहे'. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीमध्ये मोदींना भेटणार असल्याने सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची मोदींसोबतची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी ते पुण्यामधील कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींना विमानतळावर भेटले होते. सत्तास्थापनेनंतरची पहिली भेट पुण्यात  शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निर्माण झालेल्या तिढ्यानंतर सहा डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. देशपातळीवरील पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. त्यावेळी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचले होते. मात्र त्यावेळी त्यांनी केवळ मोदींचं स्वागत करुन लगेच  मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये विशेष काही चर्चा झाली नव्हती. आता युतीमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची ही निवांत भेट असणार आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. लहान भाऊ मोठ्या भावाला भेटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या पंतप्रधान मोदींशी भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला

मागील वर्षी शिवसेना भाजप युती तुटली  मागील वर्षी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची तीन दशकांची युती तुटली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या. मात्र नंतर मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. यानंतरशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. पहिल्यांदाच ठाकरे परिवारातील सदस्य मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला. या ठाकरे सरकारला आता जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत. या भेटीत ते आणखी कुणाला भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Embed widget