एक्स्प्लोर

'ठाकरे' सरकारची दिल्लीवारी! मोदी, शाह, सोनिया गांधी आणि अडवाणींसोबत खलबतं

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ अडवाणींसोबत खलबतं, सीएएला समर्थनाची भूमिका कायम, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच दिल्लीवारी करत अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. सर्वप्रथम दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा मोठा भाऊ अर्थात पंतप्रधान मोदींना भेटले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सीएए, एनआरसीविषयी आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे आज गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट झाली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासभर चर्चा झाली. केंद्रानं रखडवलेला महाराष्ट्राचा निधी, संपूर्ण देश ढवळून काढणारे सीएए, एनआरसी आणि एनआरपी हे कायदे आणि याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर मोदी आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सीएएला घाबरण्याचं कारण नाही : मुख्यमंत्री सीएएला घाबरण्याचं काही एक कारण नसून, एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिची उद्धव ठाकरेंनी मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिलीय. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिन्ही कायद्यांना तीव्र विरोध आहे. अशात उद्धव ठाकरेंनी कायद्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेनंतर सोनिया गांधी आणि शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. CAA ला घाबरण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्यासोबत तासभर चर्चा - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी तासभर चर्चा केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. सोबतच पत्रकार परिषदेत सीएए आणि एनआरसी वरुन घेतलेल्या भूमिकांवरही दोघांच्या चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनेचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी अडवाणी यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या सर्व भेटीदरम्यान, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे सोबत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहां यांचीही भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये काय खलबतं हे मात्र गुलदस्त्यात आहे. CM Thackeray Meet Advani | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget