(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा, आज पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी; पाहा प्रत्येक अपडेट्स
CM Eknath Shinde Meets PM Modi today: आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.या दौऱ्याचं सर्व अपडेट्स आपल्याला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहेत.
LIVE
Background
CM Eknath Shinde Meets PM Modi today: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम आणि अक्षय भाटकर हे दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्याचं सर्व अपडेट्स आपल्याला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करत शाह यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे'.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील.
Eknath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करु; एकनाथ शिंदे
आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. जनतेच्या इच्छेनुसार राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, एकनाथ शिंदे म्हणाले...
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, एकनाथ शिंदे म्हणाले, 'राष्ट्रपती कोविंद, अमित शाह, नड्डा यांची भेट घेतली'
CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट
दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली, कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता
Hingoli : हिंगोली जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती, दिल्ली दौऱ्यातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी
हिंगोली जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती, दिल्ली दौऱ्यातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी
Marathwada Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत.
Eknath Shinde PHOTO : शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा, मॅरेथॉन भेटीगाठी; चर्चा अन् बरंच काही
Eknath Shinde PHOTO : शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा, मॅरेथॉन भेटीगाठी; चर्चा अन् बरंच काही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.