एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022 Live updates : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. उद्या एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. पाहा आषाढीचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Key Events
Ashadhi Wari 2022 live updates Pandharpur ashadhi Ekadashi Maharashtra CM Eknath Shinde performs Maha Puja in Pandharpur temple on Ashadhi Ekadashi Maharashtra government Marathi news 9 July Ashadhi Wari 2022 Live updates : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Ashadhi Wari 2022 live updates Pandharpur ashadhi Ekadashi

Background

Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.

मुख्यमंत्री सहकुटुंब हजर

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम

विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन

पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण

सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

सकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे.

06:32 AM (IST)  •  10 Jul 2022

विठुरायाच्या पूजेवेळी शिंदे घराण्याच्या चार पिढ्या उपस्थित

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. 

06:30 AM (IST)  •  10 Jul 2022

नातवाला कडेवर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. यावेळी नातवाला कडेवर घेत त्यांनी विठुरायाची पूजा केली आहे. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget