एक्स्प्लोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट 

Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली आहे. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत. 

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री  पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलंय.  पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील. 

पुणे विमानतळावरून निघाल्यानंतर हडपसर गाडीतळ भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगीरे यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. यावेळी शिवसेनेतील काही नेते आणि पदाधीकारी देखील हडपसमधे उपस्थित राहणार आहेत. हडपसरमधे आयोजित करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमास कोण कोण उपस्थित राहतील? याकडे शिवसेना नेतृत्वाचं लक्ष असणार आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget