एक्स्प्लोर

दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला केजरीवाल सरकारकडून सरकारी नोकरी, कुटुंबाला 1 कोटी रुपये

 Arvind Kejriwal : 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला केजरीवाल सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे. याबरोबरच कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

 Arvind Kejriwal :  दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीत जीव गमावलेल्या आयबी कर्मचाऱ्याच्या भावाला अरविंद केजरीवाल सरकारने सरकारी नोकरी दिली आहे. दिल्ली हिंसाचारात अंकित शर्माची हत्या झाली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गुरुवारी या कुटुंबाला सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटवर फोटो शेअर केला आहे. त्यांनी या  ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माणसाची कमतरता कधीच भरून निघू शकत नाही.  परंतु, ही सरकारी नोकरी आणि 1 कोटी रूपयांची मदत अंकितच्या कुटुंबाला बळ देईल. भविष्यातही त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू."

फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगल झाली होती. या दंगलीत जवळपास 53 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर दिल्लीतील चांदबाग भागातील त्यांच्या घराजवळील नाल्यात मृतदेह सापडला होता. 

दरम्यान, या दंगलीच्या कट प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहाँची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, इशरत जहाँची बुधवारी संध्याकाळी पावणे आठ वाजता मंडोली तुरुंगातून सुटका करण्यात आली.

 दिल्ली न्यायालयाने सोमवारी इशरत जहाँला जामीन मंजूर केला होता. इशरत जहाँ आणि इतर अनेकांवर ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीत मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका बजावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दंगलींमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Embed widget