(Source: ECI/ABP News/ABP Majha)
25 मे पासून सुरू होणाऱ्या हवाई प्रवासाचे तिकीट दर निश्चित : हरदीप सिंह पुरी
हरदीपसिंग पुरी म्हणाले की, विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर मेट्रो ते मेट्रो शहरांसाठी स्वतंत्र नियम आणि नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असणार आहे.
नवी दिल्ली : देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे. त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. दिल्ली आणि मुंबई 90 ते 120 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी कमीत कमी 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असणार आहे. हे दर 24 ऑगस्टपर्यंत हे लागू राहणार असल्याची माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी दिली.
हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत मिशन अंतर्गत 20 हजाराहून अधिक लोकांना घरी परत आणले गेले आहे. नंतर अधिक भारतीय नागरिकांना हळूहळू भारतात परत आणले जाईल.
We've set a minimum & a maximum fare. In the case of Delhi, Mumbai the minimum fare would be Rs 3500 for a journey between 90-120 minutes, maximum fare would be Rs 10,000. This is operative for 3 months - till one minute to midnight on 24th August: Civil Aviation Minister HS Puri pic.twitter.com/oOGowbfnle
— ANI (@ANI) May 21, 2020
हरदीपसिंग पुरी म्हणाले की, 25 मे पासून सुरू असलेल्या विमानांमध्ये प्रवासी प्रवाशांना प्रोटेक्टिव्ह गिअर, फेस मास्क घालणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर सॅनिटायझरची बाटली ठेवणे बंधनकारक आहे. विमान प्रवासादरम्यान जेवणाची सोय केली जाणार आहे. उड्डाणावेळी पाण्याची बाटली गॅलरी क्षेत्रात आणि जागेवर देण्यात येणार आहे.
देशांतर्गत वाहतूक सेवेच्या अनुभवावरच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा विचार करणार असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर मेट्रो ते मेट्रो शहरांसाठी स्वतंत्र नियम आणि नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असणार आहे.
विमानाने 40 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणारी ठिकाणं, 40 ते 60 मिनिटं लागणारी ठिकाणं, 60 ते 90 मिनिटं लागणारी ठिकाणं, 90 ते 120 मिनिटं लागणारी ठिकाणं, 120 ते 150 मिनिटं लागणारी ठिकाणं, 150 ते 180 मिनिटं लागणारी ठिकाणं, 180 ते 210 मिनिटं लागणारी ठिकाणं असे वेगवेगळे सात प्रकार करण्यात आले आहेत.
Guidelines for airline services | देशांतर्गत विमान सेवेसाठी मार्गदर्शक सूचना