एक्स्प्लोर
विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आधार क्रमांक आधारित ओळखपत्र अनिवार्य
नवी दिल्ली : देशभरातल्या विमानतळांची सुरक्षा काटेकोर करण्यासाठी 1 जानेवारीपासून विमानतळ कर्मचाऱ्यांना आधार आधारित ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलं आहे. विमानतळावर कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आता आधार क्रमांकावर आधारित ओळखपत्र घ्यावं लागेल.
विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने देशभरातील सर्व विमानतळांवरील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय. त्यासाठी आवश्यक ते आदेश नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोने जारी केले आहेत.
विमानतळांवरील वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता आपल्या ओळखपत्रासोबत आधार कार्ड किंवा आधार क्रमांक असलेलंच ओळखपत्र बाळगावं लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या एम्प्लॉयरने दिलेली ओळखपत्रे आहेत, त्यांना नवी ओळखपत्र बदलून घेण्यासाठी 31 मार्च पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी आपलं आधार कार्ड ओळखपत्रासोबत बाळगायचं आहे.
विमानतळांवर प्रवेश करण्यासाठी अनेक समाजकंटक बनावट विमानतळ प्रवेश पास तयार करतात किंवा अन्य कर्मचाऱ्यांचा प्रवेश पास वापरतात. हे दोन्ही प्रकार टाळण्यासाठी प्रत्येकाला आधार क्रमांकावर आधारीत प्रवेश पास अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या सध्याच्या प्रवेश पासमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे आणि त्या कार्डाचं सहजपणे बनावट नक्कल करता येणं शक्य असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एआयएसएफचे महासंचालक ओपी सिंह यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement