एक्स्प्लोर
'मौत का सौदागर' म्हटल्यानंतरही मोदींनी दिली दिलखुलास दाद
मुंबई: पंतप्रधान मोदींनी 2007 साली काँग्रेसच्या एका टिकेवरुन गुजरातमधील निवडणुकीचं चित्रंच पालटून टाकलं होतं. 2007 साली सोनिया गांधींनी मोदींवर केलेली 'मौत के सौदागर' ही टीकाच गुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती. काँग्रेसच्या या टीकेचा मोदींनी चांगलाच वापर करुन घेतला होता. गुजरातचा स्वाभिमान आणि दहशतवादाबाबत काँग्रेसची सहानभूती असल्याचा हल्लाबोल करत मोदींनी गुजरातमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती.
'मौत का सौदागर' ही टीका काँग्रेसला तेव्हा गुजरातमध्ये भोवली होती. पण असाच उल्लेख मोदींच्या समोर आणखी एका व्यक्तीनं केला आणि त्यावेळी मोदी मात्र मनमुरादपणे हसत होत. हे खरं वाटणार नाही. पण याचाच व्हिडिओ खुद्द पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवर शेअर केला आहे.
2007 साली गुजरात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर जानेवारी 2008मध्ये चेन्नईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यासाठी मोदींना आमंत्रित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमावेळी मोदींची 'मौत के सौदागर' अशी ओळख करुन देण्यात आली. पण त्यावेळी मोदी नाराज नव्हते तर चक्क दिलखुलासपणे हसत होते.
प्रसिद्ध पत्रकार, राजकीय विश्लेषक चो रामास्वामी यांनी एका कार्यक्रमात मोदींची 'मौत के सौदागर' अशी ओळख करुन दिली होती. 'मौत का सौदागर पण दहशतावादाचा, मौत का सौदागर पण भ्रष्टाचार...' रामास्वामींनी मोदींची अशी ओळख करुन देताच त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यावेळी मोदींनाही आपलं हसू लपवता आलं नव्हतं. 'तुघलक' या नियतकालिकेच्या वार्षिक वाचक संमेलनासाठी मोदींना चेन्नईत आमंत्रित करण्यात आलं होतं.
VIDEO:
दरम्यान, आज पहाटे चो रामास्वामी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांना पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरुन श्रद्धांजलीही वाहिली. पण फक्त श्रद्धांजलीच वाहिली नाहीतर तर त्यांच्या आठवणींनाही मोदींनी उजाळा दिला. 'मौत का सौदागर' अशी ओळख करुन देणाऱ्या रामास्वामींचा व्हिडिओही मोदींनी शेअर केला आहे. VIDEO:The feisty Cho Ramaswamy introduces me as the 'Merchant of Death.' Do watch this memorable interaction. https://t.co/2FsF64sVvH
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016
I returned the favour, but don't think I matched Cho's eloquence. Hear what I said about him. https://t.co/wPxYLc1fTb — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016संबंधित बातम्या: प्रसिद्ध राजकीय विश्लेषक चो रामास्वामी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement