एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हेरगिरीखोर चीनचं भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष; स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवर चीनची पाळत

भारतातील दिग्गज व्यक्तींपाठोपाठ आता चीन भारतीय अर्थव्यवस्थेवरही पाळत ठेवून असल्याचा खुलासा झाला आहे. पेमेंट अॅप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अॅप्स आणि या अॅप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास 1400 व्यक्ती आणि संस्थांवर चीन पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : हेरगिरीखोर चीनची आता आणखी एक कुरापत समोर आली आहे. चीन करत असलेल्या भारताच्या हेरगिरीबाबत आता आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. चीन आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष ठेवून असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिलं आहे. या वृत्तानुसार, भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपाठोपाठ चीन भारतातील स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवरही पाळत ठेवत असून पेमेंट अॅप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अॅप्स आणि या अॅप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास 1400 व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

इंटर्नशिप करणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवरही चीनची नजर

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, चीनची नजर भारतीय रेल्वेत इंटर्नशिप करणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासोबतच संपूर्ण स्पेक्ट्रमला व्यापणार्‍या कमीतकमी 1400 संस्थावरही आहे. एवढचं नाहीतर चीन देशातील स्टार्टअप्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि भारतातील परदेशी गुंतवणूकदार आणि त्यांचे संस्थापक तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांवरही चीनची नजर आहे.

लडाखमधील परिस्थिती कशी? LAC वर आतापर्यंत काय काय झालं?; राजनाथ सिंह निवेदन देणार

भारतील कोणत्या गोष्टींवर पाळत ठेवून आहे चीन :

  • पेमेंट अॅप्स
  • सप्लाई चैन
  • डिलीवरी अॅप्स
  • टेक स्टार्टअप्स
  • ट्रॅफिक अॅप्स
  • वेंटर कॅपिटल
  • शहरी रहदारी
  • डिजिटल हेल्थकेयर
  • डिजिटल एजुकेशन

या कंपन्यांच्या संस्थापक, CEO, CFO, CTO आणि COO यांच्यावर चीनची पाळत

  • टीके कुरियन- प्रेमजी इन्वेस्ट मधील मुख्य गुंतवणूक अधिकारी.
  • अनीश शाह- ग्रुप सीएफओ, महिंद्रा ग्रुप.
  • पीके एक्स थॉमस- सीटीओ, रिलायन्स ब्रँड.
  • ब्रायन बाडे- मुख्य कार्यकारी, रिलायन्स रिटेल.
  • विनीत सेखसरिया- कंट्री हेड, मॉर्गन स्टेनली.
  • फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल.
  • झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल.
  • स्विगीचे सह-संस्थापक आणि सीईओ नंदन रेड्डी.
  • न्याकाचे सह-संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर.
  • उबर इंडियाचे प्रमुख चालक संचालन पावन वैश्य.
  • PayU चे चीफ नमित पोटनीस.

चीनकडून भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात काल खुलासा करण्यात आला होता की, चीन भारतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून असून त्यांची हेरगिरी करत आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच माजी पंतप्रधान, तसेच माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ज्ञ, आमदार, नगराध्यक्ष, सरपंच आणि सैन्य दलाशी निगडीत जवळपास 1350 लोकांवर चीन पाळत ठेवून आहे. तसेच इंडिय एक्सप्रेसच्या वृत्ताने ज्या नावांचा खुलासा केला आहे. त्यामध्ये देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे.

चीनच्या शेनझेन आणि झेन्हुआ इंफोटेक पाळत ठेवून

चिनी कंपन्या शेनझेन इंफोटेक आणि झेन्हुआ इंफोटेक भारतावर पाळत ठेवण्याचं काम करत आहेत. शेनझेन इंफोटेक कंपनी भारतासंदर्भातील ही माहिती चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारसाठी गोळा करत आहे. या कंपन्यांचं काम दुसऱ्या देशांवर नजर ठेवण्याचं आहे.

चीनच्या हेरगिरीवर सरकारचं उत्तर

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चिनी कंपन्यांनी भारतासंदर्भातील हेरगिरी चीनच्या सरकारने सांगितल्यामुळे केली आहे. चीनच्या हेरगिरीबाबत खुलासा झाल्यानंतर सरकारने 200 चिवी कंपन्यांवर बंदी घातली असून चीनला 4G आणि 5G च्या लिलावापासून दूर ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

भारताविरोधात नवनव्या चाली खेळणाऱ्या चीनला मोठा धक्का; ‘ECOSOC’चं सदस्यत्व भारताकडे

चीनचं कारस्थान! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget