एक्स्प्लोर
ईएनबीए अवॉर्डमध्ये एबीपी न्यूज नेटवर्कची छाप, मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना बेस्ट अँकर पुरस्कार
आज दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. माझा कट्टा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ईएनबीएच्या सोहळ्यात खांडेकर यांचा आज सन्मान करण्यात आला.

नवी दिल्ली : ईएनबीए अवॉर्डमध्ये एबीपी न्यूज नेटवर्कचा डंका वाजला. ईएनबीए अवॉर्डमध्ये एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना मराठीतील बेस्ट अँकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. माझा कट्टा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ईएनबीएच्या सोहळ्यात खांडेकर यांचा आज सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात एबीपी न्यूज नेटवर्कच्या एबीपी न्यूज वृत्तवाहिनीला सर्वोत्तम हिंदी वृत्तवाहिनीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मॅनेजिंग एडिटर रजनीश आहुजा यांनी स्वीकारला. यासोबतच एबीपी आनंदोचे संपादक सुमन डे यांना बांगलातील सर्वोत्तम अँकरचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात एबीपी न्यूज नेटवर्कने छाप पाडली.
आणखी वाचा























