येत्या 1 ऑक्टोबरपासून 'या' बँकांचे चेक बुक बंद होणार, नव्या चेक बुकसाठी त्वरित अर्ज करा
तीन बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank) यांचा समावेश आहे.

मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर (MICR) कोड अवैध (Invalid) ठरणार आहे. या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank) यांचा समावेश आहे.
1 एप्रिल 2020 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीनीकरण झाले आहे. आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्वकाही पीएनबीचे आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे.
Multibagger Stock : एक महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
इंडियन बँकेने अलीकडेच एका ट्वीटमध्ये माहिती दिली होती की, अलाहाबाद बँकेचे पूर्वीचे MICR कोड आणि चेकबुक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांनी 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी नवीन चेक बुक घ्यावे.
Ways to Save Money | तज्ञांच्या मते पैसे वाचवण्याचे जिनियस मार्ग!
इंडियन बँकेच्या मते, ग्राहक जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, आपण इंटरनेट बँकिंग (Inernet Banking) किंवा मोबाईल बँकिंग (Mobile Banking) द्वारे देखील अर्ज करू शकता.
Take note & apply for your new cheque book through👇
— Punjab National Bank (@pnbindia) September 8, 2021
➡️ ATM
➡️ Internet Banking
➡️ PNB One
➡️ Branch pic.twitter.com/OEmRM1x6j0
पंजाब नॅशनल बँकेने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, "ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेक बुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होतील. कृपया दोन्ही बँकांची जुनी चेकबुक पंजाब नॅशनल बँकेच्या नवीन चेक बुकसह बदलून घ्यावे. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की नवीन चेक बुकसाठी एटीएम, इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन द्वारे अर्ज केला जाऊ शकतो.
























