मास्टर शेफ संजीव कपूर यांच्या किचनमधून रोज 20 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवण
सध्या इथून दिवसाला 20 हजार जेवणाचे डबे हे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलताता, गोवा यांसह इतर महानगरातील रूग्णालयांतल्या वैद्यकीय कर्मचा-यांना पोहचवले जात आहेत

मुंबई : 'फुड इज लव्ह' हा संदेश देत भारताचे मास्टरशेफ संजीव कपूर आणि स्पॅनिश-अमेरिकन मास्टरशेफ होजे अँड्रेज हे वर्ल्ड सेंट्रल किचनच्या माध्यमातून कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान देशभरातील मेडिकल फ्रंटलाईन वर्कर्ससाठी जेवण पोहचवण्याचं काम करत आहेत.
मुंबईच्या टी-2 आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस शेजारी असलेल्या 'ताज स्टॅट्स' या कार्गो किचनमधून हे काम सध्या केलं जातंय. एरवी विमानात ऑनबोर्ड दिलं जाणारं जेवण पोहचवण्याचं काम या किचनमधनं होत असतं. मात्र सध्या मोजकीच विमानसेवा सुरू असल्यानं इथनं कोरोनाकाळात वैद्यकीय सेवा पुरवणा-या डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचा-यांना मोफत जेवणं पुरवलं जातंय. कसं सुरू आहे हे काम?, याची पाहणी करण्यासाठी संजीव कपूर आणि होजे हे यानिमित्त सध्या तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत.
सध्या इथून दिवसाला 20 हजार जेवणाचे डबे हे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलताता, गोवा यांसह इतर महानगरातील रूग्णालयांतल्या वैद्यकीय कर्मचा-यांना पोहचवले जात आहेत. लवकरच संपूर्ण भारतात दिवसाला 1 लाख फूड पैकेट्स पोहचवण्याचं उद्दीष्ट 'वर्ल्ड सेंट्रल किचन'नं समोर ठेवलं आहे.
संजीव कपूर म्हणाले, कोरोनाच्या काळात एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. कोणीही मदत करु शकतो. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जेवण बनवत असाल तर त्याचवेळी दोन-चार गरजूंसाठी देखील तुम्ही जेवण बनवून त्यांची मदत करता येईल. तसेच कोरोना नियमांचे पालन करुन देखील या लढाईत तुम्हाला योगदान देता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
