एक्स्प्लोर
Advertisement
चॅटिंगवरुन पत्नीशी वाद, पतीची आत्महत्या, गर्लफ्रेण्डनेही आयुष्य संपवलं
आपल्या बॉयफ्रेण्डने आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर सैरभैर झालेल्या वेनेलाने अॅसिड प्यायलं, मात्र रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचाही मृत्यू झाला.
हैदराबाद : गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करताना पत्नीने हटकल्यानंतर पतीने भीतीपोटी आत्महत्या केली, तर विरहातून गर्लफ्रेण्डनेही आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सिकंदराबादमध्ये समोर आली आहे. 27 वर्षीय शिवकुमार आणि त्याची 19 वर्षीय मैत्रीण वेनेलाने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवकुमार सातत्याने व्हॉट्सअॅपवर गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करत असे. या गोष्टीचा जाब त्याच्या पत्नीने विचारला. इतकंच नाही, तर या गोष्टीची घरातील वडिलधाऱ्यांकडे तक्रार करण्याचा धाकही दाखवला. यामुळे भेदरलेल्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपल्या बॉयफ्रेण्डने आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर सैरभैर झालेल्या वेनेलाने अॅसिड प्यायलं. मात्र रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचाही मृत्यू झाला.
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात शिवकुमारचं लग्न झालं होतं. मात्र शेजारी राहणाऱ्या वेनेला या बालमैत्रिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. पत्नीने वारंवार तंबी देऊनही शिवकुमारने संबंध तोडले नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement