एक्स्प्लोर

केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत बदल, सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश

सरन्यायाधीशाऐवजी मंत्रीमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री असतील. पंतप्रधान आणि ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणजे तीन जणांच्या समितीत आधीच 2-1 असं बहुमत असणार आहे.

नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नेमणुकांबाबत आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या  समितीत बदल करण्यात आला आहे. या समितीत देशाचे प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये ऐतिहासिक निकाल देत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीत  ऐतिहासिक बदल करत यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीशांची समिती सुचवली होती. सरकारने सरन्यायाधीश वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला आहे. केंद्र सरकारने योग्य कायदा करेपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची समिती निवड करेल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं जाहीर करत या समितीत सरन्यायाधीशाऐवजी मंत्रीमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री असतील. पंतप्रधान आणि जेष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणजे तीन जणांच्या समितीत आधीच 2-1 असं बहुमत असणार आहे.

मुळात निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचं हे प्रकरण कोर्टात याबाबत 2015 च्या दरम्यान एक जनहित याचिका दाखल झाली होती. मनमानी पद्धतीनं आणि कधी कधी राजकीय फायद्याचा विचार करुनच या नियुक्त्या होत असल्याचा त्यात आरोप होता. 2018 मध्ये हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवलं गेलं.पण नोव्हेंबर 2022 मध्ये त्याबद्दलची सुनावणी पूर्ण झाली होती. निवडणूक आयोगाचे सदस्य  केंद्र सरकारला एकतर्फी पद्धतीनं नियुक्त करता येणार नाहीत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. केवळ पंतप्रधानांची शिफारस पुरेशी नसेल तर आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश या तिघांची समिती राष्ट्रपतींकडे नावाची शिफारस करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता यामध्ये केंद्र सरकारने बदल करत सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. 

निवडणूक आयोगात आता निष्पक्ष, पारदर्शी पद्धतीनंच नेमणुकांची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली  होती. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षनेता एकटा पडला असून सत्ताधाऱ्यांचं बहुमत आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाची नेमणूक निष्पक्ष होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरातील हा सुप्रीम कोर्टाचा दुसरा निर्णय असून जो बदलत केंद्र सरकार एक वेगळा कायदा आणू इच्छित आहे.

हे ही वाचा :

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सीबीआय तपासावर सुप्रीम कोर्टाची देखरेख; तीन निवृत्त न्यायाधीशांचीही समिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget