एक्स्प्लोर

Chandrayaan-3 : चंद्राच्या आणखी जवळ जाणार चांद्रयान -3; विक्रम लँडर वेगळं झाल्यानंतर आता डिबुस्टिंगची प्रक्रिया

Chandrayaan-3 Mission : चांद्रयान -2 च्या तुलनेत चांद्रयान -3 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता चांद्रयान -3 च्या सॉफ्ट लँडिंगची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.

श्रीहरिकोटा : भारत आता चंद्रापासून (Moon) काही अंतरच दूर आहे. चांद्रयान -3 (Chandrayan) हे दिवसागणिक यशस्वीरित्या चंद्राच्या आणखी जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी विक्रम लँडर (Vikram Lander) हे यशस्वीरित्या प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे आता इस्रोच्या (ISRO) शास्रज्ञांसह संपूर्ण देश आता चांद्रयान -3 च्या यशस्वी लँडिंगची वाट पाहत आहेत. तसेच येणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये विक्रम लँडरचा वेग कमी करुन त्याला लँडिंगसाठी तयार करण्यात येणार आहे. 

 रोवर चंद्रावर कधी लँड होणार?

प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळं झाल्यानंतर आता मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर समाविष्ट आहे. त्यामुळे आता हे चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेमध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत. यामुळे लँडर आणि रोवरला चंद्राच्या आणखी जवळ जाता येणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास तयार असणार आहे. चांद्रयान -2 च्या तुलनेत चांद्रयान -3 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे चांद्रयान -3 सॉफ्ट लँडिंग करणं सहज शक्य होणार आहे.  23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी  5.47 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग करणं सहज शक्य होणार आहे. 

शेवटची प्रक्रिया सुरु होणार

लँडर वेगळे झाल्यानंतर या संदर्भातली माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, विक्रम लँडर  प्रोप्लशन मॉडेलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. शुक्रवार 18 जवळपास दुपारी चार वाजता विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे लँडर चंद्राच्या कक्षेच्या आणखी जवळ जाण्याची आशा आहे. 

प्रोपल्शन मॉड्यूल देणार महत्त्वाची माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूलसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यावर बोलतांना इस्रोने म्हटलं आहे की, प्रोपल्शन मॉड्यूल सध्या ज्या भागामध्ये त्या भागामध्ये ते काही महिने किंवा वर्ष फिरणार आहे. तसेच हे  प्रोपल्शन मॉड्यूल अंतराळातील अनेक महत्त्वपूर्ण माहिती देखील पुरवत राहणार असल्याचं इस्रोकडून सागंण्यात आलं आहे. 

2019 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाले होते अयशस्वी

चांद्रयान-2 हे 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यास अयशस्वी झाले होते. त्यानंतर इस्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-3 ची मोहिम हाती घेतली. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करुन तिथे वैज्ञानिक प्रयोग करण्याचं या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. जवळपास 600 कोटी रुपये खर्च करुन चंद्रयान-3 ला 14 जुलै रोजी यशस्वीपण प्रक्षेपित करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chandrayaan-3 : ISRO च्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रांवर उतरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget