PM Modi : विक्रम लॅंडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नाव 'शिवशक्ती'; पंतप्रधानांची मोठी घोषणा
PM Modi Visit Bangalore Meet ISRO Scientist Team : भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले.
PM Modi Visit Bangalore Meet ISRO Scientist Team : भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा करून भारतात परतले. भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
#WATCH | The spot where Chandrayaan-3’s moon lander landed, that point will be known as ‘Shivshakti’, announces Prime Minister Narendra Modi at ISRO Telemetry Tracking & Command Network Mission Control Complex in Bengaluru pic.twitter.com/1zCeP9du8I
— ANI (@ANI) August 26, 2023
'या' दोन जागेचं नामकरण
ज्या स्थानावर चंद्रयान -3 चे मून लँडर उतरले आहे. त्या पॉईंटला शिवशक्ती या नावाने ओळखलं जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच चांद्रयान-2 ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली. तसेच, 'हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.' असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
'जिथे आपण पोहोचलो तिथे कोणीच पोहोचले नाही' - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. 23 ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाउनची खात्री झाल्यावर इस्त्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला."
'एकेकाळी आपली गणना तिसऱ्या रांगेत व्हायची'
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.
'तुम्ही रोल मॉडेल आहात' - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले, तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करून दाखवता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अवकाश दिन' म्हणून साजरा करणार भारत; बंगळुरूत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा