Chandigarh University Girls Hostel: मुलीला 'तो' व्हिडीओ बनवण्यास भाग पाडले, सुत्रांची माहिती; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
Chandigarh University Girls Hostel: सूत्रांच्या माहितीनुसार. चंदीगड विद्यापीठ लीक व्हिडीओ प्रकरणातील दोन आरोपी हा व्हिडीओ बनवण्यासाठी संबंधित मुलीला ब्लॅकमेल करत होते.
Chandigarh University Girls Hostel Video Leak : चंदीगड विद्यापीठाच्या महिला वसतिगृहातील व्हिडीओ लीक प्रकरणी तपास करत असलेल्या पंजाब पोलिसांनी एका विद्यार्थिनीच्या 12 क्लिप जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आणखी एका आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांनी तीन आरोपी, व्हिडिओ बनवणारी तरुणी, तिचा शिमला येथील कथित प्रियकर आणि त्याचा मित्र यांना आधीच ताब्यात घेतले आहे. तिघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता, पोलिसांनी आणखी एकाची ओळख पटवली आहे, त्याचे नाव मोहित आहे. जो व्हिडीओ लीक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा करताना, सूत्रांनी सांगितले की चंदीगड विद्यापीठ लीक व्हिडीओ प्रकरणातील दोन आरोपी वसतिगृहातील मुलींचे व्हिडिओ बनवण्यासाठी संबंधित मुलीला ब्लॅकमेल करत होते. जाणून घ्या या प्रकरणातील महत्वाचे मुद्दे
जाणून घ्या या प्रकरणातील महत्वाचे मुद्दे
-महिला वसतिगृहातील खाजगी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर चंदीगड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
-वसतिगृहात आंघोळ करत असलेल्या सुमारे 60 मुलींचे व्हिडिओ लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे, विद्यापीठाने निवेदन जारी करत सांगितले की, एका मुलीने व्हिडिओ बनवला होता आणि तो हिमाचल प्रदेशातील तिच्या मित्रासोबत शेअर केला होता.
-कॅम्पसमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या अफवांचे खंडन करताना, विद्यापीठाने सांगितले की, हा व्हिडिओ एका विद्यार्थिनीने लीक केला होता, ज्याने स्वतः हा व्हिडिओ तिच्या एका मित्राला पाठवला होता. चंदीगड विद्यापीठाच्या प्रो-चांसलरने कॅम्पसमध्ये आत्महत्या किंवा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करणारे निवेदन जारी केल्यानंतर ही माहिती समोर आली.
-या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 354-सी (व्हॉयरिझम) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
-पोलिसांनी प्रथम व्हिडीओ बनवल्याचा आरोप असलेल्या महिला विद्यार्थ्याला अटक केली, त्यानंतर हिमाचल प्रदेशातील 23 वर्षीय पुरुषाला अटक केली, जो तिचा प्रियकर असल्याची अफवा पसरली होती. 31 वर्षीय त्याच्या मित्रालाही ताब्यात घेण्यात आले.
-पोलिसांनी तिन्ही आरोपींचे फोनही जप्त केले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिन्ही आरोपींची मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली जातील.
-पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून त्यात केवळ महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-पोलिसांनी सोमवारी तिन्ही आरोपींना मोहाली येथील खरार न्यायालयात हजर केले आणि दहा दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली.
-निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर, चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी 1.30 वाजता आपले आंदोलन संपवले, असे मोहालीचे पोलिस प्रमुख सोनी यांनी सांगितले.
-दरम्यान, विद्यापीठाने 24 सप्टेंबरपर्यंत न शिकवण्याचे जाहीर केले, त्यानंतर अनेक विद्यार्थी त्यांच्या घरी परतले. या घटनेच्या चौकशीसाठी विद्यापीठाने नऊ सदस्यांची समितीही स्थापन केली आहे.