Edible Oil Price : गगनाला भिडलेले खाद्य तेलाचे दर कमी होण्याची शक्यता
तेल निर्मात्या कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या जवळील तेलाच्या स्टॉकची माहिती एका वेब पोर्टलवर नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे
Edible Oil Price : दसरा, दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे भाजीपाल्यांचे दर कडाडलेत, मात्र भाजीच्या फोडणीसाठी लागणारं तेल स्वस्त होणार आहे. कारण खाद्यतेलाच्या साठेबाजीवर केंद्र सरकारनं मर्यादा आणल्यात. शिवाय खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
याशिवाय तेल निर्मात्या कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या जवळील तेलाच्या स्टॉकची माहिती एका वेब पोर्टलवर नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय घाऊक विक्रेत्यांना तेलाच्या किमती स्पष्ट स्वरुपात दिसतील अशा पद्धतीनं जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार खरेदी करता येईल.
Petrol Diesel Price Hike : दोन दिवसांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ; देशातील सर्वाधिक दर मुंबईत
गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलावरील बेसिक ड्यूटी 2.5% कमी करत शून्य केली आहे. या तेलावरील शेती उपकर पाम तेलासाठी 7.5% आणि कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफुलाचे तेलावरील कर 5% नी कमी केले आहे.
देशाक पाम तेल आणि सोयाबीन तेल आयात केले जाते. भारतीय बाजारपेठेचा विचार करता पाम तेलाची भागीदारी 30-31% आहे. तर सोयाबीन तेलाची 22% आहे. रबीडी पामोलिन ऑयल (RBD Palmolein Oi), रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लावर ऑईलवरील बेसिक ड्यूटी 32.5% वरून 17.5 टक्के करण्याक आली आहे.
गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात औद्योगिक विकास दर हा 7.1 टक्के इतका होता. तो आता वाढला असून या ऑगस्टमध्ये तो 11.9 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येताना दिसत आहे.