एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol Diesel Price Hike : दोन दिवसांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ; देशातील सर्वाधिक दर मुंबईत

Petrol and Diesel Price in India : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर मुंबईत आहेत.

Petrol Diesel Price Hike : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. यापूर्वी बुधवारी आणि मंगळवारी तेलाच्या किमती स्थिर होत्या. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 35-35 पैशांची प्रति लिटर वाढ झाली आहे. दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 104.79 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत 93.54 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 110.75 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 101.40 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. पाटनामध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल 108.04 प्रति लिटर, तर डिझेल 100.07 प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 105.43 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचे दर 96.63 रुपये प्रति लिटर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.10 रुपये प्रति लिटर दरानं, तर डिझेल 97.93 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. चंडीगढमध्ये पेट्रोल 100.86 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.34 रुपये प्रति लिटरनं विकली जात आहे. 

देशातील प्रमुख महानगरांतील दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली   104.79 93.54
मुंबई  110.75 101.40
कोलकाता  105.43 96.63
चेन्नई  102.10 97.93

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Embed widget