एक्स्प्लोर
Advertisement
केंद्र सरकारने 'पद्म'साठी धोनीसह दिग्गजांची नावं डावलली?
नवी दिल्ली : 'पद्म पुरस्कार 2017' साठी ज्या नावांची शिफारस करण्यात आली होती, त्यापैकी अनेक दिग्गजांची नावं केंद्र सरकारने डावलली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नावाची शिफारस नसतानाही त्यांना पुरस्कार देण्यात आला, असं एका वृत्तामधून समोर आलं आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबत वृत्त दिलं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, दिवंगत एअर होस्टेस नीरजा भानोत, प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुस्सैन यांची नावं केंद्र सरकारने डावलली, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
केंद्र सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये पद्म पुरस्कारांसाठी 89 नावं जाहीर केली. यामध्ये 7 जणांना पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण आणि 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पद्म पुरस्कारांसाठी एकूण 18 हजार 768 नावांची शिफारस करण्यात आली होती. लवकरच राष्ट्रपती भवनात या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कारांसाठी शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली नव्हती. या दोघांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वृत्तानुसार शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी यांना सार्वजनिक जीवन श्रेणीत पुरस्कार देण्यात आला.
गृहमंत्रालयाकडे पद्म सन्मानासाठी आलेल्या शिफारशींनुसार अध्यात्मिक नेते गुरमीत राम रहिम सिंह यांच्या नावाला सर्वात जास्त पसंती दर्शवण्यात आली होती. 1986 साली विमान अपहरणादरम्यान मृत्यू झालेली एअर होस्टेस नीरजा भानोतसाठी भाजप खासदार किरण खेर यांनी शिफारस केली होती.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अमिताभ रॉय यांच्या नावालाही केंद्र सरकारने पसंती दिली नसल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. न्यायमूर्ती रॉय यांनीच शशीकला यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, अभिनेत्री जया बच्चन, श्रीदेवी, निर्माते आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा आणि संगीतकार अनु मलिक यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला होता.
धोनीसह अनेक खेळाडूंच्या नावाचाही प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. माजी तीरंदाज डोला बॅनर्जी, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा यांच्या नावाला सरकारने पसंती दर्शवली नाही.
संबंधित बातम्या :
पहिल्यांदाच 'पद्म' सामान्य मानकरींना, सत्तास्थानांना नाही : मोदी
पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?
पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो
विराट, साक्षी आणि दीपा कर्माकरला पद्म पुरस्कार
पद्म पुरस्कारांच्या यादीत यंदा सर्वांना धक्का देणारी नावे
पद्म पुरस्कारासाठी सर्वसामान्यही शिफारस करू शकणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement