एक्स्प्लोर
चंदिगढमध्ये शीख महिलांना हेल्मेटसक्तीतून केंद्राची सूट
आता फक्त पगडीधारीच नाही, तर पगडी परिधान न करणाऱ्या शीख महिलांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल.

चंदिगढ : चंदिगढमध्ये शीख धर्मीय महिलांना यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. दिल्ली सरकारने जारी केलेली अधिसूचना पाळण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी गुरुवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर शीख महिलांना स्कूटर चालवताना हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली.
पगडीधारी शीख महिला वगळता सर्व महिलांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याचं चंदिगढ प्रशासनाने 6 जुलै रोजी अधिसूचना काढून सांगितलं होतं. मात्र धार्मिक कारणास्तव शीख धर्मीयांनी याला विरोध केला होता.
आता फक्त पगडीधारीच नाही, तर पगडी परिधान न करणाऱ्या शीख महिलांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंदिगढ मोटर वाहन नियमात बदल करण्यात आले.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















