"सर्व तपशील वेळेत जाहीर करणार"; मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं वक्तव्य
CEC Rajiv Kumar: सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला (SBI) 12 मार्चपर्यंत इलेक्टोरल बॉण्डचा (Election Bonds) हेशोब निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते.
CEC Rajiv Kumar on Electoral Bonds Data: SBI नं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निवडणूक रोख्यांची माहिती सादर केली आहे. याबाबत SBI नं सर्वोच्च न्यायालयात (13 मार्च) प्रतिज्ञापत्र दाखल करून संपूर्ण माहिती दिली. आता याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांचं वक्तव्य समोर आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी CEC जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पोहोचले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला (SBI) 12 मार्चपर्यंत इलेक्टोरल बॉण्डचा (Election Bonds) हेशोब निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 15 मार्चला सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोग आपल्या संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील जाहीर करणार आहे. अशातच याचसंदर्भात मु्ख्य निवडणूक आयुक्तांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मी सर्व तपशील घेऊन वेळेवर डेटा प्रकाशित करेल असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, माध्यमांशी बोलताना सीईसी राजीव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयला डेटा देण्यास सांगितलं होतं, त्यांनी (SBI) 12 मार्च रोजी वेळेवर डेटा प्रदान केला. ते म्हणाले की, निवडणूक आयोग नेहमीच पारदर्शकतेच्या बाजूनं राहिला आहे. मी जाऊन डेटा पाहीन आणि योग्य वेळी डेटा प्रकाशित करेन.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलेलं वक्तव्य आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेळेत डेटा प्रकाशित केल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला? हा निधी कोणी दिला? याची माहिती जनतेला मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
#WATCH | Jammu, J&K: On review of poll preparedness in the UT of J&K for upcoming Lok Sabha Elections, CEC Rajiv Kumar says, "We are fully committed to conducting elections here in J&K and in the country peacefully and with maximum participation. We are fully prepared for the… pic.twitter.com/fdOgDLYvSm
— ANI (@ANI) March 13, 2024
निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या मुद्द्यावर काय म्हणाले राजीव कुमार?
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मी ना Appointee आहे आणि ना Appointed. हा या दोन गोष्टींमधला विषय आहे. नियुक्ती वेळेवर व्हायला हवी, पण त्यासाठी मी आवश्यक असलेली वेळ देऊ शकत नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी आयोग पूर्णपणे सज्ज
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबाबत सीईसी राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि देशात शांततेनं लोकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करून निवडणुका पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. निवडणूक घेण्यास आमची पूर्ण तयारी आहे.