CBSE 12th Date Sheet 2023: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान
CBSE Board Exam Time Table 2023: दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील.
CBSE Board Exam Time Table 2023: सीबीएसईच्या (CBSE Exam) दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलंय.
सीबीएसईच्या (CBSE) साली जवळपास 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्यावर्षी बारावीमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
CBSE Class 10 & 12 exams to start from February 15, 2023 pic.twitter.com/KuFmdVfnHi
— ANI (@ANI) December 29, 2022
असे डाऊनलोड करा वेळापत्रक
- वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in य संकेतस्थळाला भेट द्यावी
- दहावी, बारावी परीक्षा शेड्युल 2023 वर क्लिक करावे
- त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील
- विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी
- विद्यार्थ्यांनी प्रिंट आऊट काढावे
दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या 2 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीसाठी (CBSE 12th Exams) प्रॅक्टिकल परीक्षा घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची 'अनुपस्थित' ऐवजी 'रीशेड्यूल' अशी नोंद केली जावी, असंही बोर्डानं म्हटलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI