एक्स्प्लोर
Advertisement
तात्काळ तिकीट घोळासाठी ‘त्या’ CBI प्रोग्रामरकडून अमेरिकेच्या सर्व्हरचा वापर
तात्काळ तिकीट घोळावर आता नवीन माहिती समोर येत आहे. या घोळाच्या तपासासंदर्भात सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून अमेरिका आणि रशियाला एक पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली : तात्काळ तिकीट घोळावर आता नवीन माहिती समोर येत आहे. या घोळाच्या तपासासंदर्भात सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून अमेरिका आणि रशियाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून अशा काही सर्व्हरची माहिती मागितली आहे, ज्यांच्या माध्यमातून अटक करण्यात आलेल्या CBI च्या प्रोग्रामरने रेल्वे तिकीट बुकींगच्या सिस्टिमला भगदाड पाडले होते.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात CBI चा असिस्टंट प्रोग्रामर अजय गर्ग आणि त्याचा सहकारी अनिल गुप्ताने बेकायदेशीर सॉफ्टवेअरसाठी अमेरिकेच्या एका सर्व्हरचा आधार घेतला होता. विशेष म्हणजे, हा घोळ उघड होत असल्याचे लक्षात येताच, त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यासाठी काही ई-मेल रशियाच्या सर्व्हरवर तयार कण्यात आले होते.
सूत्रांनी सांगितलं की, या लोकांनी बनवलेला सर्व्हरवर एक होस्ट (संचालक) होता. आणि गर्ग आणि गुप्ता द्वारे उप्लब्ध करुन दिलेल्या यूजर नेम आणि पासवर्डच्या माध्यमातून हा होस्ट एण्ड यूजर्स त्याच्यापर्यंत पोहचत होता. हे दोघेही आपला सॉफ्टवेअर वापरासाठी ट्रॅव्हल एजेन्टकडून एक हजार ते 1200 रुपये वसूल करत होते.
आरोपींनी तयार केलेलं सॉफ्टवेअर ‘निओ’ नावाच्या अमेरिकेतील सर्व्हरच्या माध्यमातून चालवले जात होते. हे करण्यापाठीमागे दोन मुख्य कारणं होती. पहिलं म्हणजे, सर्व्हरवर ट्रॅफिकचा स्पीड वाढवणे, दुसरं म्हणजे तपास यंत्रणांपासून स्वत:चा बचाव करणं. त्यामुळे सीबीआयने अमेरिका आणि रशियामधील त्यासंबंधित बँका आणि सर्व्हरची अधिक माहिती मिळवण्यासाठी इंटरपोलशी संपर्क साधला आहे.
अजय गर्गची निवड प्रक्रियेद्वारे 2012 मध्ये सीबीआयमध्ये नियुक्ती झाली होती. तो सीबीआयमध्ये असिस्टन्ट प्रोग्रामरच्या स्वरुपात काम करत होता. त्याने 2007 ते 2011 दरम्यान आयआरसीटीसीमध्येही काम केलं होतं. जे रेल्वेचं तिकीट बुकींगशी संदर्भात होतं.
आयआरसीटीसीमध्ये काम करताना गर्गला त्यांच्या सॉफ्टवेअरमधील अनेक त्रुटीची माहिती मिळाली. याचाच फायदा, त्याने आपलं नवं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी केला. सूत्रांनी सांगितलं की, अजय गर्ग आणि त्याचा सहकारी अनिल गुप्ताचं नेटवर्क संपूर्ण देशभर विस्तारलेलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत सीबीआयने 10 एजन्टची ओळख पटवली असून, त्यांच्या चौकशीतून इतर एजन्टची माहिती मिळेल.
दरम्यान, या प्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत देशभरातील 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात राजधानी दिल्लीसह मुंबई आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या छापेमारीत 89 लाखाची रोकड, दोन सोन्याची बिस्किटं, 61 लाख रुपयांचे दागिने, 15 लॅपटॉप, 15 हार्ड डिस्क, 52 मोबाईल फोन, 24 सिम कार्ड, सहा वायफाय राऊटर, चार इंटरनेट डाँगल आणि 19 पेन ड्राईव्ह सह इतर सामान जप्त केलं आहे.
संबंधित बातम्या
तात्काळ तिकीटांचा घोळ, सीबीआयचा प्रोग्रॅमरच अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement