एक्स्प्लोर
Advertisement
सीबीआय संचालक राकेश अस्थानांसह चार बड्या अधिकाऱ्यांची बदली
सीबीआयचे माजी महासंचालक आलोक वर्मा यांना हटवल्यानंतर आता सीबीआयच्या 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीबीआयचे माजी महासंचालक आलोक वर्मा यांना हटवल्यानंतर आता सीबीआयच्या 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बदली करण्यात आली आहे. अस्थाना यांच्यासह अरुण कुमार शर्मा, मनीष कुमार सिन्हा, जयंत नाईकनवरे या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयची प्रतिमा मलिन होत असल्याने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना, सीबीआयचे संयुक्त संचालक अरुणकुमार शर्मा, डीआयजी मनिषकुमार सिन्हा, पोलीस अधीक्षक जयंत नाईकनवरे यांचा कार्यकाळ घटवण्यात आला आहे. तसेच तत्काळ हे आदेश लागू करण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हटले आहे.
सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. दोघांनीही एकमेकांवर जाहीररित्या विविध प्रकारचे आरोप केले होते. या घटनेला माध्यमांनी सीबीआय विरुद्ध सीबीआय असे युद्ध सुरु असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर #CBIvsCBI हा हॅशटॅग खूप दिवस ट्रेन्डमध्ये होता. या वादानंतर केंद्र सरकारने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी आलोक वर्मा यांनी सीबीआयच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुन्हा जुन्या पदावर बदली केली होती. सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
Tenure of CBI Special Director Rakesh Asthana and three other CBI officers curtailed by Appointments Committee of the Cabinet, with immediate effect. pic.twitter.com/TXbhwQ9kVO
— ANI (@ANI) January 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement