एक्स्प्लोर

दहा राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट!

वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय.

नवी दिल्ली: देशातील दहा राज्यांमध्ये चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातही पाहायला मिळते आहे. एबीपी माझाने मुंबईसह चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये एटीएमचा रियालिटी चेक केला. यामध्ये शहरासह उपनगरातल्या बहुतेक एटीएम सेंटरमध्ये खडखडाट पाहायला मिळाला. कुठे रोकड संपल्याचे फलक लावले आहेत, तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचं कारण लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं ग्राहकांची मोठी तारांबळ झालेली पाहायला मिळते आहे. तिकडे अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी सुरु केली आहे. एटीएममध्ये पैसे का नाही, याचं कारणंही नागरिकांना कळत नसल्यानं त्यांची मोठी धांधल उडताना पाहायला मिळते आहे. वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थिती आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर: आरबीआय सणासुदीच्या काळात कॅशला आलेल्या मागणीमुळे आत्ता नोटांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातंय. जितक्या नोट पुरवणं आवश्यक होतं, तितक्या नोटांचा पुरवठा झाला नाही असं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असं आरबीआयने म्हटलं आहे. बाजारात पुरेसा पैसा, लवकरच परिस्थिती नियंत्रणात : अरुण जेटली बाजारात पुरेसा पैसा उपलब्ध आहे. बँकांमध्येही पैसे आहेत. काही ठिकाणी अचानक पैशाची मागणी वाढली. मात्र काळजी करण्याचं कारण नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली रोख रकमेचा तुटवडा जाणवत असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात नोटांचा तुटवडा जाणवत आहे. योगी आदित्यनाथ याबाबत देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिणार आहेत. बिहारला सर्वाधिक फटका नोटांचा सर्वाधिक तुटवडा बिहारला बसला आहे. अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. एबीपी न्यूजने पाटण्यातील सर्वात व्हीआयपी परिसर अर्थात राजभवन जवळच्या एटीएममध्ये तपासणी केली. मात्र तिथेही पैसे नव्हते. जर सर्वात व्हीआयपी परिसरात अशी स्थिती असेल, तर अन्यत्र काय, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. नोटांचा तुटवडा का? स्टेट बँकेचे बिहार विभागाचे अधिकारी मिथीलेश कुमार यांच्या माहितीनुसार, एटीएममध्ये डिपॉझिट अर्थात पैसे भरण्याचं प्रमाण काहीसं घटलं आहे. बिहारमध्ये एसबीआयचे 1100 एटीएममध्ये दररोज 250 कोटी रुपये भरले जातात, मात्र सध्या केवळ 125 कोटी रुपयेच भरले जात आहेत. त्यामुळे पैशाचा तुटवडा जाणवत आहे, असं कुमार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget