एक्स्प्लोर
नदीच्या पुरात कार वाहून गेल्यानं एका महिलेसह 5 मुलींचा दुर्दैवी मृत्यू

पिटलंम (तेलंगणा): तेलंगणामधील पिटलंम तालुक्यात पिल्ली नदीच्या पुरात एक कार वाहून गेली. ज्यामध्ये एका महिलेसह तिच्या पाच मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरामध्ये वाहून जाणाऱ्या या कारमधील चालक मात्र सुदैवानं बचावला आहे. सर्व मृत हे मेदक जिल्ह्यातील तडकल गावचे रहिवाशी असल्याची माहिती समजते आहे. आपल्या लहान मुलीला दवाखान्यातून दाखवून परत येत असताना ही घटना घडली. पिल्ली नदीला पूर आल्याने पुलावरील आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकांना गाडी पाण्यात घातली. याचवेळी पाण्याच्या वेगानं ही कार वाहून गेली. ज्यामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांची नावे 1. टी. राजमानी (वय 39 वर्ष) 2. ज्योती (वय 9 वर्ष) 3. प्रिया (वय 7 वर्ष) 4. ज्ञानसंहिता (वय 3 वर्ष) 5. ज्ञानसंहिनी (ज्ञानसंहिता आणि ज्ञानसंहिनी या दोन्ही जुळ्या मुली) 6. बिपाशा (वय 10 महिने)
आणखी वाचा























