एक्स्प्लोर
वऱ्हाडाची कार तलावात कोसळून सहा चिमुरड्यांचा मृत्यू
लग्न समारंभ आटोपून परतणारी गाडी तलावात कोसळून बिहारमध्ये सहा लहान मुलांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी आहेत

पाटणा : वऱ्हाडाची कार तलावात कोसळून बिहारमध्ये सहा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाडावर आपटून गाडी तलावात पडली. कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि झाडावर आपटून गाडी तलावात कोसळली. अपघातात गाडीत असलेल्या दहापैकी सहा बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश आहे. लहानग्यांचे मृतदेह पाहून त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केला. चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















