एक्स्प्लोर

Bypolls Result 2021: आसाममध्ये भाजप, बंगालमध्ये तृणमूल, हिमाचलमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

bypoll election results 2021: देशभरात झालेल्या लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या २९ जागांचे निकाल, निर्णायक आघाडी स्पष्ट झाली आहे. भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये धक्का बसला आहे.

Bypolls election results : देशभरातील लोकसभेच्या तीन आणि विविध राज्यातील विधानसभेच्या २९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि निर्णायक आघाडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मतमोजणी अजूनही सुरू आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीए, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, राजस्थान, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळाले आहे. दादरा नगर हवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या आहेत. कलाबेन डेलकर या महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत.

राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये मतदारांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मात्र, सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे. तर, विधानसभेच्या जुब्बल-कोटखाई आणि अर्की या जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, फत्तेहपूर विधानसभेच्या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेची जागा काँग्रेसने भाजपकडून खेचून आणली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रामस्वरूप शर्मा विजयी झाले होते. तर, पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवार ब्रिगेडिअर कुशल ठाकूर यांचा 8766 मतांनी पराभव केला.

हरियाणातील एकमेव जागेवर INLD पक्षाचे अभय चौटाला यांचा विजय निश्चित आहे.

राजस्थानमधील धरियावद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार नगराज मीणा यांचा विजय झाला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार थावरचंद यांचा 18 हजार 725 च्या मताधिक्याने पराभव केला. तर, वल्लभनगर जागेवर काँग्रेस उमेदवार प्रीति सिंह शक्तावत आघाडीवर आहेत.

आसाममधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचही जागांवर भाजप नेतृत्वातील एनडीएने दमदार विजयाच्या वाटचाल सुरू केली आहे. भाजप उमेदवार फणीधर तालुकदार. रुपज्योती कुर्मी आणि सुशांता बोरगोहन आघाडीवर आहेत. पाचपैकी तीन जागांवर भाजपला तर उरलेल्या दोन जागी मित्रपक्ष UPPL ला मोठी आघाडी मिळाली आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या चार जागांवर मतदान झाले होते. या चारही जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमृण काँग्रेसने विजयी आघाडी घेतली आहे. दिनहाटामध्ये तृणमृल काँग्रेसच्या उदयन गुहा यांनी एक लाख 63 हजार मतांनी विजय नोंदवला.

बिहारमधील दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. जेडीयूनं कुशेश्वरस्थान विधानसभेची पोटनिवडणूक 12695 मतांनी जिंकली. राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला. तर तारापूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अरूण कुमार आणि जेडीयूचे उमेदवार राजीव कुमार सिंह यांच्यात चुरशीची लढाई सुरू आहे. दोघांमध्येही एक हजारापेक्षाही मतांचे अंतर असून जेडीयू आघाडीवर आहे.

मेघालयात भाजपचा मित्रपक्ष असलेला NPP नॅशनल पीपल्स पार्टीचा उमेदवारही राजबाला मतदारसंघातून विजयी झाला आहे.  मिझोराममध्ये MNF पक्षाने तुरियल जागेवर विजय मिळवला आहे.

कर्नाटकातील दोन विधानसभेच्या जागांपैकी एक जागा भाजपनं तर दुसरी जागा काँग्रेसनं खिशात घातली आहे.. बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर ही लढाई अटीतटीची झाली होती. काँग्रेसने हंगल विधानसभा मतदारसंघाची जागा 7373 मतांनी जिंकली आहे. या ठिकाणी भाजप दुसऱ्या आणि जेडीएस तिसऱ्या स्थानी राहिली. तर, भाजपने सिंदगी विधानसभेची जागा 31 हजार 185 मतांनी जिंकली. या ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या आणि जनता दल (सेक्युलर) तिसऱ्या स्थानावर होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget