Bulli Bai App Case : 'बुली बाई' अॅप प्रकरणात चौथी अटक, उत्तराखंडमधील 21 वर्षीय तरुण अटकेत
Bulli Bai App Case : 'बुली बाई' अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. उत्तराखंडमधून एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Bulli Bai App Case : 'बुली बाई' अॅप प्रकरणात पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. उत्तराखंडमधून एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कोटद्वारच्या शिब्बूनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या घरातून पकडले आहे. यापूर्वी पोलिसांनी एक महिला आणि दोन पुरुषांना अटक केली होती. यातील दोन आरोपी उत्तराखंड आणि एक बंगळुरू येथून पकडले गेले.
बुली बाई अॅपवरून मुस्लीम महिलांचे फोटो ऑनलाईन शेअर करून मुस्लिम महिलांची बदनामी केली जात होती. पोलिसांनी असाही दावा केला आहे की, आरोपींनी त्यांच्या ट्विटर हँडलमध्ये शीख समुदायाशी संबंधित नावांचा वापर करून लोकांची दिशाभूल केली.
बुली बाई प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. बुली बाई अॅप प्रकरणी उत्तराखंडमधील मयंक रावल (21), श्वेता सिंह अटक करण्यात आली आहे. तर अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार झा (21) याला सोमवारी बंगळुरू येथून अटक करण्यात आली. आता उत्तराखंडमधूनच आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये अटक केलेल्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी मुंबईत आणले आहे. मयंक रावल आणि श्वेता सिंह या दोन्ही आरोपींना वांद्रे येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांची सायबर क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर या दोन्ही आरोपींना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : भारताला ओमायक्रॉनचा विळखा, 26 राज्यांमध्ये 3 हजाराहून अधिक ओमायक्रॉनबाधित
- Coronavirus in India : देशात कोरोनाचा विस्फोट, मागील 24 तासांत 1 लाख 17 हजार 100 नवे रुग्ण
- Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अॅप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha