एक्स्प्लोर

वेळेवर सुरु होणार बुलेट ट्रेन, 60 टक्के भूसंपादन पूर्ण, रेल्वेचा दावा

बुलेट ट्रेनसाठी (bullet train) हायस्पीड रेल कॉरिडोर प्रोजेक्टसंदर्भात काही कामं सुरु झाली आहेत.बुलेट ट्रेन वेळेवर सुरु होणार असून 60 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

नवी दिल्लीः बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी अद्याप वाढवलेला नाही. अपेक्षा आहे की, ही हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमध्ये आपल्या निर्धारित वेळेत तयार होईल. मात्र जोपर्यंत 90 टक्के भूसंपादन पूर्ण होत नाही, तोवर ग्राऊंड वर्क, रेल्वे मार्ग तयार करण्याचं काम सुरु होणार नाही, अशी माहिती  रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली आहे. विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की, अहमदाबाद ते मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडोर प्रोजेक्टसाठी 60 टक्के भूसंपादन झालं आहे. यापैकी 37 टक्के भूसंपादन गुजरातमध्ये तर 23 टक्के महाराष्ट्रात झालं आहे. Bullet Train | बुलेट ट्रेन प्रकल्प रखडण्याची चिन्हं; राज्य सरकारी तिजोरीत खडखडाट महाराष्ट्रात भूसंपादनाला विरोध  बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाला महाराष्ट्रात सर्वाधिक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांशी सामंजस्य होऊ शकलेलं नाही. रेल्वेकडून शेतकरी तसेच त्यांच्या संघटनांना अनेक सोयीसुविधा देण्याबाबत आश्वासनं दिली जात आहेत. तसेच जमीनीला पाच पट अधिक पैसे दिले जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे ही वाचा- बुलेट ट्रेनची व्यवहार्यता न तपासताच प्रकल्पाला मंजुरी बुलेट ट्रेनची ही कामं सुरु बुलेट ट्रेनसाठी हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रोजेक्टसंदर्भात काही कामं सुरु झाली आहेत. हायस्पीड ट्रेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार झालं आहे. प्रोजेक्टच्या मार्गात येणाऱ्या कॉनकोरसाठी डेपो स्थानांतरित करण्याचं काम सुरु आहे. तसंच प्रोजेक्ट दरम्यान संपादित जागांवर येणाऱ्या झाडांना विशेष टेक्नोलोजीने दुसरीकडे नेण्याचं काम देखील सुरु आहे.  अहमदाबादमध्ये साबरमती पॅसेंजर हबच्या निर्मितीचं काम सुरु आहे. बडोद्यात छायापुरी स्टेशनच्या पुनर्निर्माणाचं काम देखील प्रगतीपथावर आहे. जपानी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना जपानी भाषेचे धडे  काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
  • मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स
  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात
  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.
     बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर
  • मुंबई-अहमदाबाद - 3000 रुपये
  • बीकेसी-ठाणे - 250 रुपये
  • मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) - 3000 रुपयांहून अधिक
  • एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.
  • बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
  • 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
      कोणकोणत्या सुविधा
  • उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
  • महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं
  • प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
  • डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
  • स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
  • स्वयंचलित ब्रेक यंत्रणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget