Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसंदर्भात BSP अध्यक्षा मायावतींची सर्वात मोठी घोषणा; NDA की INDIA कोणाशी युती?
Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन आणि केडर मजबूत करण्याच्या सूचना BSPच्या अध्यक्षा मायावती यांनी दिल्या आहेत.
BSP Chief Mayawati Meeting: लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Lok Sabha Elections 2024) लखनौमध्ये (Lucknow) आज बहुजन समाज पक्षाची (Bahujan Samaj Party) बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीबाबत पक्षाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच पक्ष मजबूत करण्याच्या सूचनाही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत.
बसपाच्या अध्यक्षा मायावती (BSP Chief Mayawati) यांनी प्रत्येक गावात छोट्या बैठकांच्या आधारे संघटना आणि केडर मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच पक्षाचा जनमानस वाढवण्यासाठी जुन्या चुका टाळून नव्यानं काम सुरू करण्यास सांगितलं आहे. या बैठकीत मायावतींनी स्पष्ट केलंय की, युतीमुळे बसपाला नफ्याऐवजी तोटाच होत आहे. बसपाचं मत युतीतील दुसऱ्या पक्षाला हस्तांतरित केलं जातं. परंतु, दुसऱ्या पक्षाकडून त्याचं मत बसपाच्या उमेदवाराकडे हस्तांतरित केलं जात नाही.
23-08-2023-BSP PRESS NOTE-LOK SABHA UP PREPARATORY MEETING pic.twitter.com/jb21dCMQAE
— Mayawati (@Mayawati) August 23, 2023
मायावतींनी साधला काँग्रेस अन् भाजपवर थेट निशाणा
मायावतींनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजपच्या संकुचित जातीवादी आणि धार्मिक राजकारणामुळे, द्वेषभावना आणि अराजकतेला आश्रय देणार्या सर्व जनतेचं जीवन संकटात सापडलं आहे. भाजप आता केवळ आपला प्रभावच नाही, तर आपला जनाधारही गमावत आहे. त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही. ही निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल.
बसपा प्रमुख म्हणाल्या की, काँग्रेसप्रमाणेच भाजपच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठा फरक आहे. त्यांच्या राजवटीत उत्पन्न कमी आणि खर्च खूप झाला आहे. काही मूठभर लोक सोडले तर इतर सर्वांना, विशेषत: बहुजन कुटुंबांना आपला उदर्निवाह करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार आहे.
बसपा संघटनेत महत्त्वाचे बदल
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपानं संघटनेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, त्याबाबत मायावती म्हणाल्या की, यूपीसारखं मोठं आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं राज्य असल्यानं येथील राजकीय परिस्थिती वारंवार बदलत असते. म्हणूनच काही बदल आवश्यक आहेत. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी त्यांना कमी लेखू नये, पक्षाचं हित सर्वोपरी मानून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत रहा, असं आवाहन बैठकीदरम्यान मायावती यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :