एक्स्प्लोर

BMC निवडणुकीत राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र असते तर 118 जागा, भाजपला फक्त 64 अन् काँग्रेसला 25 जागा; शिंदे गटाची धाकधूक वाढवणारी आकडेवारी

Raj Thackeray and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षांची चांगलीच पिछेहाट झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. तीन वर्षांपूर्वीच्या बंडाचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत बसला. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उद्या 5 जुलै रोजी दोघेही वरळीतील कार्यक्रमात एकत्रितपणे उपस्थित राहणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं ही इच्छा होती. मात्र ती इच्छा त्यांना हयातीत पूर्ण करता आली नाही. दोघं कधीच राजकीयदृष्ट्या एकत्र आले नाहीत. परंतु महायुती सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीबाबत काढलेल्या निर्णयामुळे (जीआर) हे शक्य झालं. या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. जनतेतही मोठा असंतोष उसळला. सरकारला शेवटी दोन्ही हिंदी जीआर मागे घ्यावे लागले. सरकारला नमवण्यात यश आल्याने आता ठाकरे बंधू एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्या युतीची शक्यता चर्चेत आली आहे.

राज आणि उद्धव एकत्र आले, तर मुंबईतील राजकीय चित्र कसं असेल, यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनीतीकार अमिताभ तिवारी यांनी एक महत्त्वपूर्ण आकडेवारी सादर केली आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेना एकसंध होती आणि भाजपसोबतची युती तुटलेली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेनं 84, भाजपनं 82, काँग्रेसनं 31, मनसेनं 7, राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 आणि इतर पक्षांनी 14 जागा जिंकल्या होत्या.

मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे 

शिवसेना: 28.3 टक्के

भाजप: 27.5 टक्के

काँग्रेस: 16.2 टक्के

मनसे: 7.7 टक्के

अमिताभ तिवारी यांच्या मते, जर 2017 सालच्या निवडणुकीत उद्धव आणि राज एकत्र आले असते, तर त्यांना एकत्रितपणे 118 जागा मिळाल्या असत्या. या मतविभाजनाचा सर्वात मोठा फायदा भाजप आणि काँग्रेसला झाला. युती झाली असती, तर भाजपला फक्त 64 आणि काँग्रेसला 25 जागा मिळाल्या असत्या.

मुंबईकरांचा ठाकरेंना नेहमीच पाठिंबा 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यभरात 10 टक्क्यांहून कमी मते मिळाली आणि केवळ 20 जागा जिंकता आल्या. मात्र, मुंबईत त्यांनी चांगली कामगिरी केली. 23.2 टक्के मतांसह त्यांनी 10 जागांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यभरात चांगली कामगिरी केली असली, तरी मुंबईत त्यांना 17.7 टक्के मतांसह फक्त 6 जागा मिळवता आल्या. राज्यात 1.6 टक्के मते मिळवणाऱ्या मनसेला मुंबईत मात्र 7.1 टक्के मते मिळाली आहे. शिवसेना आणि मुंबई, ठाकरे आणि मुंबई यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मुंबईकरांनी ठाकरेंना नेहमीच पाठिंबा दिला आहे. 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी 36 टक्के इतकी होती, तर भाजपची 27.5 टक्के होती.

राज आणि उद्धव एकत्र निवडणूक लढले तर...

2024 च्या निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2 टक्के, शिंदेसेनेला 17.7 टक्के, ठाकरेसेनेला 23.2 टक्के आणि मनसेला 7.1 टक्के मते मिळाली. म्हणजेच उद्धव आणि राज यांनी जर युती केली, तर त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. विशेषतः शिंदे गटाची मुंबईतील ताकद कमी असल्याचं यामुळे अधोरेखित होतं. शिवाय हिंदी भाषासक्तीचा जीआर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याकडून निघाल्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. हिंदी भाषासक्तीचा मुद्दा तापण्यापूर्वी "वोट वाईब" या एजन्सीनं घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, 52 टक्के मुंबईकरांनी सांगितलं होतं की, उद्धव आणि राज यांची युती झाली, तर ते त्यांना पाठिंबा देतील. केवळ 26 टक्के लोकांनी शिंदे गटाच्या बाजूने मत दिलं होतं. त्यामुळे जर राज आणि उद्धव एकत्र निवडणूक लढले, तर त्याचा निश्चितच दोघांनाही फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा 

Eknath Shinde Jai Gujrat : अमित शाहांसमोर पुण्यात एकनाथ शिंदे म्हणाले, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Ahilyanagar crime: मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, धारदार सत्तूर अंगावर सपासप चालवली, राम खाडेंची प्रकृती चिंताजनक
मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget