एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचांही 'जय गुजरातचा' नारा, शिवसेना शिंदे गटाकडून 'तो' व्हिडीओ शेअर

जय गुजरातच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे.

Shital Mhatre on Uddhav Thackeray :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व्यासपीठावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर विरोधकांनी चांगलीच टीका केलीय. अमित शाहंच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर आल्याचे म्हणत संजय राऊतांनी शिंदेंचा समाचार घेतला. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात या दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शितल म्हात्रे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न असे म्हणत शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात" असा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदे यांच्याकडून गुजरातचा जयजयकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
T20 World Cup 2026: आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंडची एंट्री होणार
आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी खेळणार

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
ईडीच्या केसमध्ये भुजबळांना क्लीन चीट, दमानियांचा फडणवीसांवर संताप; म्हणाल्या, मी हायकोर्टात जाणार
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Video: पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास भाग पाडले, व्हायरल व्हिडिओने खळबळ
T20 World Cup 2026: आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंडची एंट्री होणार
आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला, स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी खेळणार
Shikhar Dhawan: टीम इंडियाचा गब्बर पुन्हा एकदा 'विदेशी'च्या प्रेमात; साखरपुडा होताच एअरपोर्टवर जोडीने दिसला!
टीम इंडियाचा गब्बर पुन्हा एकदा 'विदेशी'च्या प्रेमात; साखरपुडा होताच एअरपोर्टवर जोडीने दिसला!
Bhiwandi : भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी सेक्युलर पक्षांची एकजूट, ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन, महापौरपदावर काँग्रेसचा दावा 
भिवंडीत काँग्रेस, सपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र, ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन, महापालिकेत सत्ता स्थापन करणार
बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
डोंबिवलीतील शॉरमा विक्रेत्या तरुणीचा पत्रकारांशी संवाद; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज, व्हिडिओ व्हायरल
डोंबिवलीतील शॉरमा विक्रेत्या तरुणीचा पत्रकारांशी संवाद; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज, व्हिडिओ व्हायरल
Embed widget