एक्स्प्लोर
'दया शंकरची जीभ छाटणाऱ्याला 50 लाखांचे बक्षीस'
लखनऊ: बसपा सुप्रीमो मयावतींवर उत्तर प्रदेशच्या माजी भाजप उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांने विखारी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. मायावतींवर अपमानास्पद टीका करणाऱ्या दयाशंकर सिंहची जीभ छाटणाऱ्याला 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. बसपाच्या चंदीगढ युनिटच्या चीफ जन्नत जहां यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.
पक्षातून हकालपट्टी
मयावतींवरील टीकेचा वाद चिघळल्यानंतर दयाशंकर सिंहला सहा वर्षांसाठी भजपातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष केशव मौर्य यांनी सिंहवर कारवाई केली.
काय म्हणाला दयाशंकर सिंह?
भाजपचा माजी उपाध्यक्ष दयाशंकर सिंहने मायावतींची तुलना वारांगनेशी करून, तिकीट वाटपासाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. यानंतर याचे पडसाद देशभरात उमटण्यास सुरुवात झाली. मयावतींनी या वक्तव्याची कडक शब्दात निंदा करून त्याची भाजपने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
दयाशंकर सिंह विरोधात गुन्हा
भाजपने दयाशंकरला पक्षातून निलंबीत केल्यानंतर लखनऊमध्ये बसपा नेता यांनी मेवलाल गौतम यांनी सिंहविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बसपा कार्यकर्त्य़ांना राग अनावर
दरम्यान, या प्रकरणानंतर बसपाच्या काही कार्यकर्त्यंना राग अनावर झाला. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी सिंहचा निषेध करणारे मोठमोठे होर्डिंग राज्यभर लावले होते. या होर्डिंगवरही बसपा कार्यकर्त्यांनी दयाशंकर सिंहची तुलना कुत्र्याशी केली होती. तसेच यावर अश्लिल भाषेतील टिपण्णीही करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement