एक्स्प्लोर
Advertisement
BSNL चा धमाका, तब्बल 2700 जागांसाठी भरती !
मुंबई : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. कारण भारत संचारर निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये मेगाभरती होणार आहे. BSNL मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 2700 जागा भरण्यात येणार आहेत. ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या या जागा आहेत. हंगामी आणि कायमस्वरुपी अशी ही पदं आहेत.
पात्र उमेदवार 10 ऑगस्ट 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. http://www.externalexam.bsnl.co.in/ या लिंकवर अर्ज करु शकता. 25/09/2016 रोजी ऑनलाईन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
वयोमर्यादा -
*इच्छुक उमेदावराचं वय 18 ते 30 वर्षादरम्यानच असावं.
* SC/ ST & BSNL कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये 5 वर्षांपर्यंत सूट
*अन्य वर्गातील उमेदवारांसाठी त्या-त्या आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट
शैक्षणिक पात्रता
*इच्छुक उमेदावाराने टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक/रेडिओ/कॉम्प्युटर/आयटी/इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एक अभ्यासक्रम तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा/बी.टेक/बीई, केंद्र किंवा राज्य सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत पूर्ण केलेला असावा.
निवड प्रक्रिया :
पात्र उमेदवाराची ऑनलाईन चाचणीद्वारे निवड होईल.
अर्जाची फी :
इच्छुक सामान्य आणि ओबीसी उमेदवाराला अर्जासोबत एक हजार रुपय (1,000), तर SC/ST उमेदवारासाठी 500 रुपये फी असेल.हे पैसे ऑनलाईन पद्धतीने जसे की इंटरनेट बॅँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारेच भरायचे आहेत.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार www.externalbsnlexam.com या वेबसाईटवर जाऊन 10-08-2016 पर्यंत अर्ज भरु शकतात. पात्र उमेदवारांची 25-09-2016 रोजी ऑनलाईन टेस्ट होईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी टिप्स
1) तुमच्याकडे स्वत:चा ई-मेल आयडी आणि कॉन्टॅक नंबर हवा.
2) www.externalbsnlexam.com या वेबसाईटवर क्लिक करा
3) तुम्ही इच्छुक असलेली जागा (पोस्ट) निवडा, त्यानंतर “Apply Online” वर क्लिक करा
4) तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन सबमिट करा.
5) ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
महत्त्वाच्या तारखा -
*ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - 10 जुलै 2016
* ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत - 10 ऑगस्ट 2016
*ऑनलाईन परीक्षा - 25/09/2016
या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी http://www.externalbsnlexam.com/ या लिंकवर क्लिक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement