(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indo-Pak Border : राजस्थान सीमेवर भारत-पाक सैनिकांमध्ये चकमक, बीएसएफ जवानांकडून चोख प्रत्युत्तर
BSF Firing : राजस्थानमधील अनुपगड सेक्टरमध्ये पाक रेंजर्सनी गोळीबार केला. याला चोख प्रत्युत्तर देत बीएसएफने पाकिस्तानवर गोळीबार केला. या गोळीबारात कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
India Pakistan Soldiers Firing : राजस्थानमध्ये (Rajasthan) भारत-पाकिस्तानमध्ये (Indo-Pak Border) चकमक झाली. राजस्थानमधील अनुपगड सेक्टरमध्ये (Anupgarh Sector) पाकिस्तानने (Pakistan) गोळीबार केला. याला चोख प्रत्युत्तर देत सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानवर गोळीबार केला. या गोळीबारात कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सैन्य दलाने यासंदर्भात माहिती दिली आहे. बीएसएफने यासंदर्भात शनिवारी अनुपगड सेक्टरमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
अनुपगड सेक्टरमध्ये पाक रेंजर्सकडून गोळीबार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने काही स्थानिक लोकांच्या हालचालीमुळे आधी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही (BSF Firing) प्रत्युत्तर दिलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर राजस्थानमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा गुजरात, पंजाब आणि जम्मूमधूनही जाते. बीएसएफच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत अधिक तपास सुरु आहे.
BSF, Pak Rangers exchange fire in Anupgarh sector of Rajasthan along Indo-Pak border; no casualties reported: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 9, 2022
कोणतीही जीवितहानी झालेली नाही
अनुपगड सीमेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बीएसएफने या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक शनिवारी 10 डिसेंबर रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ सेक्टरमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पाकिस्तानचे अधिकारीही सहभागी होऊ शकतात. राजस्थानच्या भारत-पाक सीमेवर गोळीबाराची घटना घडली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबाराच्या घटना फार क्वचित घडतात. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या क्षेत्रात संपूर्ण युद्धविराम करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. त्यानंतर गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या घटनेत पाक रेंजर्सनी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार केला होता.
बीएसएफ जवान अलर्टवर
पोलीस उपअधीक्षक जयदेव सियाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही भारतीय शेतकरी बॅरिकेड ओलांडून शेती करण्यासाठी गेले होते. तेव्हा भारतीय नागरिकांनी पाकच्या दोन घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान रेंजर्सच्या गोळीबारावर भारताचे बीएसएफ जवानही सतर्क झाले. बीएसएफ जवानांनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान रेंजर्सवर गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी 18 राउंड फायर केले