एक्स्प्लोर

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील सीमेवर असणाऱ्या बीएसएफच्या जवानानं काल एक व्हिडिओ पोस्ट करुन चांगलीच खळबळ माजवली. तेज बहादूर यादव या जवानानं थेट लष्करी अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशीचेही आदेश दिले आहेत. मात्र, बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणारे तेज बहादूर यादव यांच्याबाबत मात्र, काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुत्रांच्या मते, बीएसएफच्या जवानाची आतापर्यंतची कारकीर्द बरीच वादात राहिली आहे. 20 वर्षाच्या सेवेमध्ये त्याला 4 वेळा कडक शिक्षाही भोगावी लागली आहे. आपल्याच सहकाऱ्यावर बंदूक रोखल्याचाही आरोप तेज बहादूर यादववर करण्यात आला आहे. तेज बहादूरला मद्यप्राशन करण्याची वाईट सवय जडली होती: बीएसएफ दरम्यान, या प्रकरणी बीसएफकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'सुरुवातीच्या दिवसात तेज बहादूर यादवला नियमित काउंसलिंगची गरज होती. तो न सांगता बऱ्याचदा ड्युटीवर गैरहजर असायचा. त्याला दारु पिण्याचीही वाईट सवय जडली होती. त्याला जास्तीत जास्त वेळ मुख्यालयाजवळ ड्युटी दिली जात होती. पण, मागील 10 दिवसापूर्वी त्याला बॉर्डरवर पाठविण्यात आलं. कारण की, त्याचं काउंसलिंग नीट झालेलं आहे की, याची चाचपणी केली जावी यासाठी त्याला तिथे पाठविण्यात आलं होतं.' असं या पत्रकात म्हटलं आहे. याच दरम्यान, बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काय आहे नेमकं प्रकरणं: जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे. “आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगतना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं आहे. राजनाथ सिंह यांच्याकडून चौकशीचे आदेश:   या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन सांगितले, “बीएसएफ जवानाचा व्हिडीओ पाहिला असून, संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत.” एबीपी माझाने या व्हिडीओची सत्यता पडताळली नाही. संबंधित बातम्या: VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget