एक्स्प्लोर

येडियुरप्पा : तेव्हा सात, आता अडीच दिवसाचे मुख्यमंत्री!

येडियुरप्पा यांचा राजीनामा : येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी शपथ घेत तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी ते 2007 आणि 2008 मध्ये मुख्यमंत्रीपदी होते.

येडियुरप्पा यांचा राजीनामा: बंगळुरु: बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच बी एस येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे रोजी अवघ्या 55 तासात म्हणजेच अडीच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सुप्रीम कोर्टाने कालच भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज दुपारची मुदत दिली होती. भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता. पण त्यांना ते शक्य झालं नाही. तेव्हा सात, आता अडीच दिवसाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी शपथ घेत तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी ते 2007 आणि 2008 मध्ये मुख्यमंत्रीपदी होते. 2007 मध्ये केवळ सातच दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला लागलं होतं. त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली, तरी तेव्हाप्रमाणेच आताही येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात होतं. 2007 ची परिस्थिती येडियुरप्पा हे 2007 साली पहिल्यांदा सत्तेत आले. त्यावेळी त्यांनी कुमारस्वामी यांच्या जनता दलाला मदत केली होती. भाजप-जेडीएस यांच्या युतीने काँग्रेसच्या धरम सिंह यांचं सरकार पाडलं होतं. त्यावेळी भाजप-जेडीएस यांच्यात करार झाला. त्यानुसार आधी कुमारस्वामींना 20 महिने मग येडियुरप्पांना 20 महिने मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं. भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, तर येडियुरप्पा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. मग ऑक्टोबर 2007 मध्ये कुमारस्वामींची 20 महिन्यांची मुदत संपली आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली, तेव्हा कुमारस्वामींनी शब्द फिरवला. येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या येडियुरप्पा आणि त्यांच्या पक्षातील मंत्र्यांनी 5 ऑक्टोबर 2007 ला राजीनामा दिला. भाजपने अधिकृतरित्या कुमारस्वामींच्या सरकारचा पाठिंबा काढला. परिणामी कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र 7 नोव्हेंबर 2007 पर्यंत भाजप-जेडीएसने पुन्हा आपापसातील वाद मिटवल्याने राष्ट्रपती राजवट शिथील झाली. जेडीएसने येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. येडियुरप्पांनी 12 नोव्हेंबर 2007 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. मात्र मंत्रिपदांवरुन जेडीएस-भाजपमध्ये पुन्हा बिनसलं आणि अवघ्या सात दिवसात म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी सरकार ढासळलं आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. 2008 ची निवडणूक 2008 च्या विधानसभा निवडणुकीत बी एस येडियुरप्पा यांनी शिकारीपुरा मतदारसंघात मोठा विजय मिळवला, त्यांच्या नेतृत्त्वात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि सत्तेत आला. तेव्हा भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केलं आणि 30 मे 2008 रोजी येडियुरप्पा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र तीन वर्षांनी खाण आणि जमीन घोटाळ्याच्या/भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन 2011 साली येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. 2018 ची निवडणूक 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने 222 पैकी 104 जागा मिळवल्या. मात्र बहुमतापासून 8 जागा दूर राहिला. पण तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. काँग्रेस-जेडीएसने आक्षेप घेतल्याने हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. तिथेही येडियुरप्पांना हिरवा कंदिल मिळाला. 17 मे 2018 रोजी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र 19 मे म्हणजे आज त्यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र भाजपला ते सिद्ध करता आलं नाही. येडियुरप्पा यांना केवळ अडीच दिवसात राजीनामा द्यावा लागला. संबंधित बातम्या  शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?   येडियुरप्पांचा राजीनामा, कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळलं   येडियुरप्पा देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री   फडणवीसांनाही सिद्ध करावं लागलं होतं बहुमत, राष्ट्रवादी मदतीला धावली होती!  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget